संगमनेर । झुंझार न्यूज

 

परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या कठोर तपश्चर्येचा आणि आध्यात्मिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी महाराजांच्या जीवनातील त्याग, साधना आणि लोककल्याणासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

गुंजाळवाडी येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आरंभी उद्योजक दिलीप शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले की,महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते एक आध्यात्मिक शक्तिस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.


महाराजांचे मूळ कुळ विचारू नये, असे म्हटले जाते आणि तेच खरे आहे. कारण त्यांचे कार्य, तपश्चर्या आणि भक्तांवरील कृपाच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या आगमनाने ही भूमी पवित्र झाली असून भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावातून येथे चैतन्य निर्माण झाले आहे. जिथे महाराजांचे स्मरण आणि नामस्मरण असते, तिथे त्यांच्या कृपेची किमया हमखास अनुभवास येते, असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *