संगमनेर । झुंझार न्यूज

 

अलोट गर्दीत निघालेल्या भव्य मिरवणुकीने गावातील एकोप्याचे आणि गावपणाचे दर्शन घडवले. गावपण असेच असावे, याचे आदर्श उदाहरण गुंजाळवाडीकरांनी सादर केले. मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्र येत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

यावेळी मार्गदर्शन करताना, हा सप्ताह म्हणजे कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीचा एका भागा सारखा आहे. सोशल मीडियावरील अनावश्यक गोष्टी पाहण्यापेक्षा महाराजांचे विचार आणि कार्य अनुभवा. ही विचारांची महापर्वणी असून गगनगिरी महाराजांची अद्भुत शक्ती प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देईल, असा विश्वास उद्योजक गगनगिरी महाराज यांचे भक्त आबासाहेब थोरात यांनी
व्यक्त करण्यात केला.

तसेच गेले दोन अडीच महिन्या पासून स्वतःची सुरू असलेली तयारी यास गावातून तालुक्यातून आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनातून, कृतीतून, सहभागातून या सप्ताहासाठी योगदान लाभले त्यांचे थोरात यांनी मनःपूर्वक आभारही मानले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *