योजना एप्रिल महिन्यापासून हाेणार सुरु , यातून लालपरीला नवसंजीवनी मिळणार                                                                                                            नगर : झुंजार न्यूज                                     महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महिलांना आता हाफ तिकिटावर राज्यभर प्रवास करता येणार आहे. याबाबत राज्य सरकारने नुकतीच घाेषणा केली. त्याची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून हाेणार आहे. त्यामुळं कायमच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी अर्थात लालपरीला नवसंजीवनी मिळणार आहे.

मागील आठवड्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. यात महिलांसाठीही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात.

विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. आता संबंधित याेजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही लालपरीच्या उत्पन्नात माेठा फायदा हाेईल, असे तज्ज्ञांचे मत आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *