सौ.पायल ताजणे यांनी घेतला डॉ. थोरातांच्या वक्तव्याचा समाचार
संगमनेर । झुंझार न्यूज
सर्व सतास्थाने असताना सुध्दा मागच्या पंचेचाळीस वर्षात संगमनेला रेल्वे प्रकल्प का येवू शकला नाही ॽआणि आघाडी सरकारच्या काळात मार्ग बदलण्याचे काम कोणी केले याचे आत्मपरीक्षण आधी डॉ.जयश्री थोरात यांनी करावे अशी प्रतिक्रिया भाजपाच्या शहर अध्यक्षा सौ..पायल ताजणे यांनी दिली.
नासिक पुणे रेल्वे प्रश्नाबाबत डॉ जयश्री थोरात यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना सौ.पायल ताजणे म्हणाल्या की,रेल्वेचा प्रश्न एकमेकांकडे बोट दाखवून सुटणारा नाही.यामध्ये सर्वपक्षीय एकजुटीची गरज आहे.परंतू डाॅ जयश्री थोरात यांनी राजकीय भावनेतून केलेले वक्तव्य म्हणजे केवळ प्रसिध्दी मिळविण्याचा स्टंट आहे.
वास्तविक नासिक पुणे रेल्वेच्या संदर्भात जिलह्याचे पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहील्यापासून प्रस्तावित मार्ग संगमनेर अकोले तालुक्यातून गेला पाहीजे ही भुमिका मांडून त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केला आहे.
विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सोमवारी सर्व पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मंत्री विखे पाटील यांनी सर्व लोकप्रतिनिधीची बैठक घेवून प्रस्तावित मार्ग पहील्या आराखड्यानूसार कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
मात्र प्रत्येक प्रश्नाकडे राजकीय नजरेतून पाहाण्याची सवय लागल्याने कोणताही मुद्दा समजून न घेता डॉ जयश्री थोरात यांनी रेल्वे शिर्डीला पळविल्याचा केलेला आरोप अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा आहे.मुळात दुसर्या तालुक्याकडे बोट दाखवून तुमचे अपयश झाकणार आहे का ॽ उलट गेली अनेक वर्षे सर्व सतास्थाने सौ.जयश्री थोरात यांच्या परीवारात आणि नात्यातच होती.पण भारतीय जनता पक्षाने या विषयाचे राजकारण होवू न देता या प्रश्नाबाबतच्या तुमच्या अपयशावर कधीही टिका टिपणी केली नाही.
परंतू दुसर्या तालुक्याकडे बोट दाखवून तुम्ही तुमच्या पंचेचाळीस वर्षाचे अपयशच एकप्रकारे कबूल करीत आहात.प्रस्तावित मार्ग राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलला गेला याची माहीती आधी डॉ जयश्री थोरात यांनी करून या विषयाचा सखोल अभ्यास करूनच त्यांनी बोलणे उचित ठरले असते असे सौ. पायल ताजणे यांनी म्हणले आहे.