{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

अहिल्यानगर । झुंझार न्यूज 

 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या वतीने शेवगाव येथे आगामी मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी एका ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदासजी आठवले यांचा भव्य नागरी सत्कार आणि आरपीआयचा जिल्हास्तरीय ‘संकल्प मेळावा’ संपन्न होणार आहे.

 


हा भव्य सोहळा शेवगाव येथील आखेगाव रोडवरील ‘साईधन मंगल कार्यालय’ येथे दुपारी ठीक ४:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद आरपीआयचे नेते तथा राज्याचे उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव भूषविणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती नामदार राम शिंदे, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील , आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. काशिनाथ दाते सर, आ. मोनिकाताई राजळे, आ. संग्राम भैय्या जगताप, आ. प्रजक्ता तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, आमदार अक्षय कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


१. पुतळा भूमिपूजन: शेवगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते होईल.


२. नागरी सत्कार: दलितांचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.


३. संकल्प मेळावा: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘संकल्प मेळावा’ आयोजित केला आहे.


या कार्यक्रमासाठी आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश महातेकर, राज्य महासचिव गौतम सोनवणे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , राज्य सचिव दिपकराव गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) सुरेंद्र थोरात, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, जिल्हा विभाग प्रमुख भिमा बागुल , विवेक भिंगारदिवे, अमित काळे, आणि जिल्हाभरातील सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष ( दक्षिण ) सुनिल साळवे , राजेंद्र मगर, विनोद खंडागळे, सुनील मोरे, निलेश जगधने, शरद मोहिते, विठ्ठल मगर, गौरव मगर, बबीता मगर आणि संयोजन समितीचे सर्व सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत. अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ( दक्षिण ) सुनिल साळवे , जिल्हा कार्याध्यक्ष संजय भैलुमे आणि जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम यांनी केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *