आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वावर तरुणांचा विश्वास

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील बाळूमामा भक्त मंडळातील २५ ते ३० तरुणांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे समनापूर परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाले असून, तालुक्यात आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

 

मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सोपान चांडे, विशाल चांडे, सुनील चांडे, साई चांडे, भाऊसाहेब चांडे, आकाश चांडे, ओंकार पोलगर, शुभम चांडे, सार्थक शेरमाळे, संदीप वैद्य, सचिन चांडे, अमोल गेठे, जुम्मा शेख, मोठ्याबापू शेरमाळे, मीरा शेख, पांडू देवकाते, प्रणय शेरमाळे, रावसाहेब शेरमाळे, संजय उदमले, सुनील पोकळे, शंकर शेरमाळे, किरण पाकळे, महादू शेरमाळे यांच्यासह २५ ते ३० तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


यावेळी शिव सेनेचे ज्येष्ठ नेते म्हतु शेरमाळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश काळे, उपतालुकाप्रमुख रणजीत जाधव, मच्छिंद्र शेरमाळे, युवासेना सचिव एकनाथ शेरमाळे, समन्वयक सुनील चांडे, शाखाप्रमुख अब्बू इनामदार, संदीप शेरमाळे, मनोज भास्कर, राजेश शेरमाळे, संपत गेठे, रावसाहेब शेरमाळे, अमोल शेरमाळे, राजेंद्र गायकवाड, राहुल पोकळे यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवेशानंतर आमदार खताळ यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या तरुणांचे स्वागत करत शिवसेनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचे काम पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

बाळूमामांच्या नावाने कमान उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न : आमदार अमोल खताळ

समनापूर येथील बाळूमामा भक्त मंडळाच्या तरुणांनी गावात बाळू मामांच्या नावाने भव्य स्वागत कमान उभारण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली. त्यांच्या या मागणीची दखल घेत आ. खताळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “बाळूमामा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या नावाने समनापूर येथे कमान उभारण्यासाठी शासनदरबारी आवश्यक तो पाठ पुरावा करून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या मागणीची निश्चितच पूर्तता करण्या साठी आपण कटिबद्ध आहोत,”

श्री अमोल खताळ पाटील
आमदार संगमनेर विधानसभा

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *