Sangmner : Zunjhar news अहमदनगर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. दुधाच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, संगमनेर-अकोले रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भरधाव दुधाच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघाता ऋषीकेश हासे (वय २० वर्षे), सुयोग हासे (वय २० वर्षे आणि निलेश सिनारे (वय २६ वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
अपघाग्रस्त तरुण दुचाकीवरून अकोलेच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी संगमनेरवरून एक दुधाचा टँकर भरधाव वेगात येत होता. मंगळापूर परिसरात या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे
