Shrirampur : Zunjhar news
एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत भाऊराव माळी यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी संस्थापक अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी भाऊराव माळी यांना नियुक्तीचे पत्र दिले . यावेळी रेवननाथ जाधव म्हणाले की , संपूर्ण राज्यात आदीवाशी समाज्याचा मोठा वर्ग असून बहुतांश ठिकाणी आदीवाशी समाज्य हा विविध सुविधा पासून वंचित आहे . समाज्यातील प्रत्येक माणसाला सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी काम करत असून तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकलव्य आदिवाशी बहुजन पार्टीशी जोडला जात आहे . समाज्याच्या सर्वागीण विकासाकरिता राजकारणातून सत्तेची अत्यंत आवश्यकता असल्याने भविष्यात सर्व निवडणुकांमधून कार्यकर्त्यांला निवडणुक लढविण्याची संधी देवून आदिवाशी समाज्याला सत्तेच्या प्रवाह आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे .
