शासनाच्या ताब्यातील संगमनेर तालुक्यातील युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांना द्या

संगमनेर । झुंझार न्यूज

सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. खरीप हंगामा बाजरी मका सोयाबीन हे पिके उभी करताना युरिया अत्यंत गरजेचे असून शासनाच्या ताब्यात असलेल्या युरियाचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांना खुली करावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी यांना संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कारखान्याचे संचालक विजय राहणे, सचिन दिघे, सरपंच नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ ,अमोल गुंजाळ, शुभम गुंजाळ ,योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ ,सागर वामन, नामदेव शिंदे, सुनील लांडगे, बाबासाहेब आभाळे, सचिन गुंजाळ ,नानासाहेब ढगे, भाऊसाहेब बालवडे ,लक्ष्मण गुंजाळ, अनिल लांडगे, सुदर्शन गुंजाळ, संगम लांडगे, सचिन लांडगे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध शेतकरी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या निर्माण झालेला युरियाचा तुटवडा हा कृत्रिम नसून अनेक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी युरियाचा साठाच उपलब्ध नाही .त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच तालुक्यात युरिया उपलब्ध असल्याची चुकीची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात कृषी विभागाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात बाजरी, मका ,सोयाबीन हे पीक तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून संगमनेर तालुक्यात असलेल्या शासनाच्या साठ्यातील युरियाचा बफर स्टॉप तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करावा. जेणेकरून खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना वेळेत युरिया उपलब्ध होऊ त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही.

यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे म्हणाले की, यापूर्वीही दरवर्षी युरिया खताची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी असायची अशावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात ही शासनाच्या विविध विभागांना सूचना देऊन शेतकऱ्यांना वेळेत युरिया उपलब्ध करून द्यायचे. शासनाचा बफर स्टॉप शेतकऱ्यांसाठी खुला करून द्यायचे मात्र आता तसे होत नसून अपयश झाकण्यासाठी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत.

 तर सचिन दिघे म्हणाले की, हा तालुका शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा तालुका आहे त्यामुळे शासनाने या सर्व बाबींची दखल घेऊन तातडीने शासनाच्या ताब्यातील युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी विजय राहणे, नवनाथ कातोरे ,संदीप गुंजाळ ,योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ ,सागर वामन, नामदेव शिंदे यांनीही विविध समस्या मांडल्या.

काँग्रेसच्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना लवकरच युरिया उपलब्ध होईल अशा अशा निर्माण झाल्या आहेत.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *