संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्राचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून 171 गावे असलेल्या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात मंदिरांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व गावांमध्ये समाज मंदिरांसह अद्यावत मंदिरे झाली असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत तुळजाभवानी मंदिरासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

कोकणगाव येथे तुळजाभवानी माता मंदिराच्या सभा मंडपासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुरेश थोरात व हरिभक्त परायण भागवत बाबा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच सौ.आशाताई जोंधळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे, उपसरपंच दिलीप जोंधळे, ॲड सुरेश जोंधळे, पोपट थोरात, मधुकर पवार, संभाजी जोंधळे, डॉ दत्तात्रय जोंधळे ,नानासाहेब वायकर, हनुमंत जोंधळे, मारुती जोंधळे ,बाबासाहेब वायकर ,बाबू नाना वायकर ,दिगंबर जोंधळे, तुकाराम जोंधळे, नवनाथ वायकर, कचरू जोंधळे ,सुरेश वायकर ,विलास जोंधळे, सचिन वायकर, रहीमपूरचे पोलीस पाटील आबासाहेब शिंदे ,बाबासाहेब शिंदे बंटी वायकर ,पप्पू वायकर, इंजिनीयर जोंधळे व इंजिनिअर शिंदे आदींसह विविध ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेश थोरात म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात प्रत्येक मंदिरांसाठी मोठा निधी देण्यात आला आहे अगदी देवकवठे पासून बोटापर्यंत प्रत्येक गावामध्ये समाज मंदिरांसह विविध मंदिरे अत्यंत आदर्शवत पद्धतीने उभी राहिली आहेत. वारकरी संप्रदायाचा विचार जोपासताना लोकनेते बाळासाहेब थोरात त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेत त्यांच्या श्रद्धा जपल्या आहेत. कोकणगाव परिसराच्या विकासासाठी सातत्याने निधी दिला असून श्री क्षेत्र निझर्वेश्वर देवस्थानसाठी ही मोठा निधी दिला आहे. या अंतर्गत या परिसरामध्ये सुशोभीकरणासह विविध अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

तर हरिभक्त परायण भागवत बाबा म्हणाले की, संगमनेर तालुका हा वारकरी संप्रदायाच्या विचारांचा तालुका राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मानवता धर्म जोपासून कायम वारकरी संप्रदायाचा विचार पुढे नेला आहे. प्रत्येक मंदिरांसाठी त्यांनी मोठी मदत केली असून आषाढी वारी निमित्त कोकणगाव मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले.

ॲड सुरेश जोंधळे यांनी प्रास्ताविक केले तर शिवाजी जोंधळे यांनी आभार मानले.
माजी मंत्री थोरात यांच्यामुळे तालुक्यातील महादेव मंदिरांसाठी मोठा निधी
संगमनेर तालुक्यात कोकणगाव येथील निझरनेश्वर, खांडगाव येथील खांडेश्वर, धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर, जवळे बाळेश्वर येथील बाळेश्वर, कोकणगाव येथील दुधेश्वर, अमृतेश्वर यांसह विविध महादेवांच्या मंदिरांना पर्यटन विकास योजनेअंतर्गत मोठा निधी दिला असून हे सर्व तीर्थक्षेत्र सर्व भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे या सर्व क्षेत्रांचा विकास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झाला असल्याचे सुरेश थोरात यांनी म्हटले आहे.
Post Views: 46
