{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

लोणी । झुंझार न्यूज 

 

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याला ६१ लाख ७६ हजार रुपयांचा अतिरीक्त निधी मंजूर झाला असल्याची माहीती जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून विश्वगुरू संत निवृत्ती महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री संत निळोबाराय महाराज व श्री ज्ञानेश्वर आषाढी वारी पालखी (नेवासा) यांच्या बरोबरच अन्य पालख्याही पंढरपूरकडे प्रस्थान करतात.

या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालये, स्वच्छतागृहे, स्नानगृहे बांधणे, पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सुविधा, औषधे पुरवणे तसेच जलरोधक मंडप उभारणी करिता यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३कोटी ८६लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

राज्यातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत अधिकचा निधी मंजूर व्हावा आशी विनंती मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना केली होती.

मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पालख्यांना आणि वारकऱ्यांना यावर्षीही प्रशासनाच्या माध्यमातून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

त्यानूसार महायुती सरकारने अतिरीक्त निधी मंजूर केला आहे.आषाढी वारीत अहिल्यानगरच्या पालख्यांचा मान महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यां करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरीक्त निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.@⁨all

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *