झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सद्गुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट देऊन ह. भ. प. महंत रामगिरीजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महंत रामगिरीजी महाराजांचे प्रवचन श्रवण करत अध्यात्म, भक्ती आणि समाजप्रबोधनाच्या या महान परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या पवित्र सप्ताहासाठी विखे पाटील परिवाराच्या वतीने १०१ पोती साखरेची सेवा करण्यात आली. तसेच या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि रस्ते दळणवळण अधिक सुकर व्हावे यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला असून, दर्शन व प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने
उपस्थिती लावली होती.

तसेच यावेळी सप्ताहासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक दाखल झाल्याने धनगरवाडी परिसरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली .


दरम्यान, वाहतूक कुंडी लक्षात येताच डॉ .सुजय विखे पाटील यांनी थेट रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला वाहनांची कोंडी दूर करत त्यांनी भाविकांनी नागरिकांसाठी रस्ता मोकळा करून दिला .लोकप्रतिनिधी म्हणून केवळ व्यासपीठावरून थांबता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी घेतलेल्या या पुढ आकाराच्या उपस्थित नागरिकांमध्ये व भाविकांमध्ये चर्चा झाली होती .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *