काबाडकष्ट करुन कमावलेला पैसा तरुणाई जुगार मटक्यावर उडवत असल्याने अनेकांचे प्रपंच धुळीस !                                                                        जुगारात पैसे हारलेली तरुणाई नैराश्याने व्यसनाधीन !                                                                                                           श्रीराम चौक ते शनिमंदिर पुल हा परिसर अवैध धंद्याचे माहेर  !                                                                                                                                                   कोपरगाव : झुंजार न्यूज                             कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील मोठ्या बाजारपेठेचे असलेले सुरेगाव -कोळपेवाडी परिसरात मटक्या बरोबर बिंगो चक्रीने व्यवसायात पदार्पण केल्याने आठ घंटे उद्योग समुहात रोजदारी मध्ये काबाडकष्ट करुन कमावलेला पैसा तरुणाई जुगार मटक्यावर उडवत असल्याने अनेकांचे प्रपंच धुळीस मिळुन जुगारात पैसे हारलेली तरुणाई नैराश्याने व्यसनाधीन होत असल्याचे चित्र परिसरात वाढू लागले आहे.


कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुह असल्याने परप्रांतीय मजूरांचे प्रमाण मोठे असून ऊसतोडणी मजूर असल्याने या भागामध्ये सुरेगाव – कोळपेवाडी परिसरात अवैध धंद्यानी पोलीस विभागाच्या आशिर्वादाने चांगलेच बस्तान बसवले असुन मटक्या बरोबर बिंगो चक्री ने परिसरात पदार्पण केल्याने तरुणाई आर्थिकदृष्टीने कंगाल होवुन व्यसना धीनतेमुळे अनेकांचे प्रपंच धुळीस मिळत आहे.सुरेगाव गोदावरी उजवा कालवा लगत श्रीराम चौक ते शनिमंदिर पुल हा परिसर अवैध धंद्याचे माहेर घर बनला आहे. पत्याचे क्लब,. दर पाच मिनिटांला दहा रुपयात बारा घराला एकशे दहा रुपये देणार्या बिंगो चक्री लॉटरी भोवती तरुणांईचा गराडा असतो. देशी दारु नवसागर गुळा पासुन तयार होणारी हातभट्टी ची गावठी दारू असे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे चालु आहेत. अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढुन शेकडो दुकान चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांना अद्याप मुद्देमाल सापडला ना चोर. कोळपेवाडी महेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली पोलीस कारभारा विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असतांना पोलिसांनी आठ दिवसांत चोरीचा तपास लावु या आश्वासनाला तिन महिने उलटुन गेले तरी अद्याप चोराचा तपास लागलेला नाही.

                                                                        जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना देत वरिष्ठांच्या कारवाईत अवैध धंदे आढळल्यास ठाणे प्रमुखांना जबाबदार धरले जाईल अशी तंबी दिलेली असतांना तालुक्यात सर्वत्र अवैध धंदे कुणाच्या आशिर्वादाने चालू आहेत? अशी उलट सुरू चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *