महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आता बारा हजार मुंबई : झुंजार न्यूज
महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर लाभ देण्यासाठी नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात.
हे वार्षिक 6000 रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन टप्प्यात मिळतात. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता अशा पद्धतीने या योजनेचे स्वरूप आहे. दरम्यान आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पी एम किसान योजनेप्रमाणेच निकष लावण्यात आले आहे. यामुळे पी एम किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा एकाच शेतकरी कुटुंबातील नवरा बायको या दोघांना लाभ घेता येईल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ नवरा बायको या दोघांना घेता येऊ शकतो का याबाबत जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम किसान चा लाभ परिवारातील एकाच सदस्याला घेता येतो. जर परिवारातील दोन सदस्यांनी या योजनेसाठी अप्लाय केलं असेल तर एका सदस्याचे नाव रद्द केले जाते. म्हणजेच नवरा किंवा बायको या दोघांपैकी एकच जणाला या योजनेचा लाभ मिळतो. आता पीएम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे स्वरूप राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देखील नवरा किंवा बायको या दोघांपैकी एकालाच होणार आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार बारा हजार
राज्यात आता नमो शेतकरी योजना सुरू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांना आता पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकरी चे 6000 असे 12000 रुपये मिळणार आहेत. दरम्यान नमो शेतकरी योजनेची अंमलबजावणी नेमकी केव्हा होईल? या योजनेचे संपूर्ण स्वरूप नेमके कसे राहील? याबाबत सविस्तर असा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच योग्य ती माहिती समोर येऊ शकणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसहित सर्वांचे नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय केव्हा निर्गमित होईल याकडे लक्ष लागून आहे.
