रंपरा, संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपणारा महावादन सोहळा उत्साहात; पाच ढोल-ताशा पथकांच्या वादनाने हजारो संगमनेरकर मंत्रमुग्ध

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

आपली संस्कृती, आपला अभिमान’ या विचाराला कृतीची जोड देत आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘महावादन सोहळा’ वर्ष दुसरे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांच्या निनादाने संगमनेरचा परिसर दुमदुमून गेला, तर हजारो संगमनेरकरांनी उपस्थित राहत या सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सोहळ्यात तांडव, हिंदूराजा, रुद्र प्रतिष्ठान, छावा आणि एकलव्य गर्जना या पाच ढोल-ताशा पथकांनी दमदार वादनाचे प्रात्यक्षिक सादर केले. पारंपरिक वादनातील कौशल्य, शिस्त आणि कलात्मकतेची अनुभूती उपस्थितांना मिळाली. पथकांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने संपूर्ण वातावरणात उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले.

परंपरेचा आणि संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपतानाच नव्या पिढीला आपल्या मातीशी जोडणारे व्यासपीठ म्हणून ‘महावादन सोहळ्या’ची ओळख निर्माण होत आहे. आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच या क्षेत्रातील कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला संगमनेरकरांनी भरभरून दाद दिली.

ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईसह सर्व वयोगटातील नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधोरेखित करणारा हा सोहळा ठरला.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महावादन सोहळ्याच्या दुसऱ्या वर्षालाही संगमनेरकरांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाशी निर्माण झालेल्या आपुलकीची प्रचिती देणारा ठरला. परंपरा जपत आधुनिक पिढीला संस्कृतीशी जोडणारे असे उपक्रम सातत्याने व्हावेत, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *