{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

हिवरगाव पावसा येथे वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा परिसरात झालेल्या जोरदार वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाच्या तीव्र तडाख्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, झाडे उन्मळून पडली, विद्युत खांबांचे नुकसान झाले, तसेच शेतकऱ्यांचे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आहे.या नुकसानीची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिली. वादळामुळे नुकसान झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्यात यावेत, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी महसूल ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या त्यानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे तालुका उपाध्यक्ष केशव दवंगे यांनी सांगितले

Oplus_131072

हिवरगाव पावसा गावचे सरपंच सुभाष गडाख ग्रामपंचायत अधिकारी हरीश गडाख आणि महसूल अधिकारी श्रीमती आवारी यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घरांचे, पत्र्यांचे, झाडांचे तसेच इतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. संबंधित नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात आले आहे. पंचनामे वेळेत झाल्याने शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक बाधित शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचे तातडीने व प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत तसेच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यात यावी

श्री केशव दवंगे (उपाध्यक्ष भाजपा संगमनेर )

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *