{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

मुख्यालयात राहून नागरिकांना विविध योजनाचा लाभ आणि शेतकऱ्यांना विश्वास द्यावा- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

टंचाई कालावधीत कृषी, पशुसंवर्धन, ग्रामविकास आणि महसूल विभागाच्या तालुकास्तरीय यंत्रणेने मुख्यालयात राहून प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे शेतकरी व नागरिकांना पिण्याचे पाणी पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. 

संगमनेर येथील मालपाणी लॉन्स येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, संगमनेरचे उप विभागीय अधिकारी अरुण उंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधीर बोराळे, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे, पशुसंवर्धन आणि इतर विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 पिक विमाबाबत कोणतीही टाळाटाळ किंवा निष्काळजीपणा चालणार नाही. पिकांचे १००% पंचनामे पूर्ण करून कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी ग्रामविकास आणि महसूल विभागांनी घ्यावी.

 *मुख्यालयात उपस्थिती अनिवार्य* कृषी, पशुसंवर्धन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्यालयात थांबून प्रत्यक्ष स्थळ भेटीद्वारे वस्तुस्थिती समजून घ्यावी. आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा. उपशोधनासाठी आवश्यक असणारा चारा डेपो त्याचप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असल्यास याबाबतचे सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल सादर करावा. संगमनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पशुधनासाठी राखीव चारा, तसेच जलसंपदांतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.

भोजापूर प्रकल्पाच्या रुंदीकरणाच्या भूसंपादनाबाबत सर्वेक्षण करून वस्तुस्थितीचा अहवाल जलसंपदा विभागाने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

  महावितरणने वीज पुरवठ्यातील कालावधी कमी करावा. तसेच नादुरुस्त डीपी (DP) आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याची कारवाई करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळेल.

 

 जल जीवन मिशन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या मालदाड, जोर्वे, वरवंडी, पाचगाव, निमोण यांसह अन्य गावांच्या पाणीपुरवठा योजनांना प्राधान्याने पूर्ण करावे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *