{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज विविध मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.


VJNT (विमुक्त जाती–भटक्या जमाती) मतदारसंघातून श्री. गणपतराव सांगळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी – संगमनेर मतदारसंघातून श्री. रणजितसिंह देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्र, शेतकरी, सभासद तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सभासद आणि संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने निवडणुकीतील राजकीय व सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

— झुंझार न्यूज

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *