{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

आमदार अमोल खताळ यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी केली प्रार्थना

 

संगमनेर । झुंझार न्यूज

सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान नांदावे, प्रत्येकाला आरोग्यसंपन्न जीवन लाभावे, तसेच सध्या महाराष्ट्रावर घोंघावत असलेल्या दुष्काळाच्या संकटाचे सावट लवकरात लवकर दूर होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी वणी येथील श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी केली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्री सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी परिवारासह भेट देऊन सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले.यावेळी आमदार खताळ म्हणाले की, नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. या उत्सवाच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद मिळविण्यासाठी आलो आहोत.

सध्या राज्यातील विविध भागांत पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे, दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि त्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना आपण सप्तशृंगी मातेच्या चरणी केल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. दरम्यान, सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सप्तशृंगी मातेची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *