आमदार अमोल खताळ आणि पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते सप्तशृंगी मातेची महाआरती

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

दुष्काळात बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना ठेवली पाहिजे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आमदार खताळ यांनी केले.


देवी गल्लीतील सप्तशृंगी माता मंदिरामध्ये नवरात्रोत्सवा निमित्त आमदार अमोल खताळ व पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते सप्तशृंगी मातेची महाआरती करण्यात आली त्यावेळी भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये नवरात्रोत्सवाला खूप महत्त्व आहे. या उत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनातून भक्तांना ऊर्जा, श्रद्धा आणि सकारात्मकतेची प्रेरणा मिळते. वणी येथील सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर संगमनेरच्या देवी गल्लीतील जागृत देवस्थान असलेल्या सप्तशृंगीची महाआरती करण्याचा मान मिळाला, हे मी माझे परमभाग्य समजतो, अशी भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली.


सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि संपन्न जीवन लाभावे, तसेच प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना करत सध्या सर्व महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट ओढवले असून, या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती सप्तशृंगी मातेने द्यावी असे सांगून ते म्हणाले की
मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि विकासाचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. आता हे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
यावेळी आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ यांचा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड श्रीकांत गोंगे, माजी नगरसेवक शिरीष मुळे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *