संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील शेतकरी अविनाश बाबुराव जोशी यांच्या कालवडीचा काल बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास दोन बिबट्यांनी हा हल्ला केला. हल्ला झाल्या त्यावेळेस अविनाश जोशी यांनी स्वतः बिबट्या प्राण्याने कालवड तोंडात धरून नेता असताना प्रत्यक्ष बघितले होते.या हल्ल्यात अविनाश जोशी यांच्या कालवडीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनरक्षक रामेश्वर मंडपे, वनकर्मचारी उत्तम भुसारी, नजीर शेख यांनी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे याबाबत सरपंच सतीश जोशी यांनी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशी मागणी वन अधिकारी यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी सरपंच सतीश जोशी, नारायण कहार, अशोक जोशी भागवत जोरी, सार्थक जोशी, प्रतिक जोशी, मयूर जोशी, बाबुराव जोशी, महेश जोशी यांनी केली आहे.