{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे नव्याने सुरू होत असलेल्या मोहटादेवी ॲग्रो सर्व्हिसेस या कृषी दालनाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या कृषी दालनाचे उद्घाटन होणार आहे.

या सोहळ्यास वरदविनायक सेवाधाम, लोणी खुर्दचे मठाधिपती ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. धार्मिक वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित सेवा व सुविधांसाठी कृषी दालनाचे महत्त्व लक्षात घेता, या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील शेतकरी बांधव, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. नामदेव दगडू पा. पुलाटे, श्री. भास्कर दगडू पा. पुलाटे, श्री. दिनकर दगडू पा. पुलाटे (सर) आणि प्रोप्रायटर श्री. आशिष दिनकर पा. पुलाटे (B.Sc. Agri., MBA – ABM) आहेत. समस्त पुलाटे पाटील परिवार व आप्तेष्ट या सोहळ्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेत आहेत. नवदुर्गा तरुण मंडळ आणि श्री स्वामी समर्थ तरुण मंडळ, दुर्गापूर यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचे ठिकाण : लोणी–हसनापूर रोड, ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ, लोणी बुद्रुक, ता. राहाता, जि. अहिल्यानगर.

या भव्य उद्घाटन सोहळ्यास सर्व शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

झुंझार न्यूज

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *