श्री क्षेत्र तांभेरे, ता,राहुरी येथे सालाबादप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता,                                                                                                                                                                         झरेकाठी : झुंजार न्यूज
महंत उध्दवजी महाराज मंडलीक यांचे काल्याचे कीर्तनातुन महाराजांनी, श्रीरामाचे चरित्र विशद करतांना, श्रीरामाचे बंधूप्रेम,व एक आदर्श शिष्य, आदर्श पती, आदर्श मुलगा आदर्श राजा कसा असावा याचे प्रतिपादन करत धर्मकार्य व समाजकारण करणेसाठी प्रत्येक गावात तरूणांचे संघटन असावे,वरिष्ठांकडून त्यांना कायम मार्गदर्शन व्हावे हे नमूद केले.

कीर्तन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहून श्रीरामनवमी निमित्ताने उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. ग्रामदेवता श्रीरामांचे मंदिरात जावून दर्शन घेतले .

तांभेरे ग्रामस्थांच्या वतीने विलास मुसमाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले . जन्मोत्सव समितीच्या वतीने सचिव चंद्रकांत पवार व अध्यक्ष बाळासाहेब मुसमाडे यांनी उध्दवजी महाराज व नामदार विखे पाटील याचा शाल व श्रीफळ देवून सन्मान केला. तर चारी नंबर २४,मुसमाडे पाटील वस्तीचे वतीने महाप्रसाद देण्यात आला.

 


सप्ताह कालावधीत भाविकांना दोन वेळेचे भोजन व चहापाणी ची व्यवस्था तांभेरे ग्रामस्तांचे वतीने करण्यात आली होती.
सप्ताह कालावीत विद्युत रोषणाई तसेच भव्य मंडप सर्वांचे लक्ष वेधत होते

काही तासात लाखो रूपयांची देणगी स्वयंस्फूर्त पणे जमा करणारे तांभेरे हे गाव तालुक्यात नावाजलेल आहे.दशावतारी खेळ अर्थात सोंगाची आखाडी हा कार्यक्रम महाराष्ट्रात बंद होवू पाहत असतांना,शहनाई चे तालावर साजरा होणारा हा कार्यक्रम आबाल,-वृध्दांचा आवडीचा पारंपारिक कार्यक्रम संपन्न होतो आहे.

काला कीर्तन प्रसंगी हजारो भाविकांनी आज श्रीराम मंदिराच्या भव्य प्रांगणात उपस्थिती दर्शविल्याने भक्ती मंडप फुलून गेला होता.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *