संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथे गुरुवार दिनांक 6 4 2023 रोजी व 7 4 2023 रोजी गावासह परिसराचे कुलदैवत खंडोबा यात्रा उत्सव साजरा होणार असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व खळी ग्रामस्थ यांनी दिली आहे .
गुरुवारी सकाळी खंडोबा देवाच्या मंदिरात डोंगरावर तळी भंडार कार्यक्रम दिवसभर आयोजित केला असून दुपारी तीन वाजता काठी मिरवणूक गाव ते डोंगरावरील खंडोबा मंदिरापर्यंत निघणार असून सायंकाळी सात वाजता ह भ प कुमारी शितलताई साबळे यांचे जाहीर हरिकीर्तन सात ते नऊ या कालावधीमध्ये आयोजित केले असून यानंतर यात्रा कमिटीच्या वतीने व खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचा आयोजन केले असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता जंगी कुस्ती हंगामा आयोजित केला असून सदर सदर यात्रा उत्सवामध्ये खळी गावासह बाहेरील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व यात्रेचा आनंद उत्सव साजरा करावा व यात्रा कमिटी मध्ये आपला सहभाग नोंदवून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव स्वीकृत विश्वस्त यात्रा कमिटी ग्रामस्थांनी केली आहे
