आश्वी : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील जैन श्रावक संघाच्या वत्तीने जैन धर्माचे चौवीस वे तिर्थ॔कर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याण महोत्सवा निमित्त गावातुन जिओ और जिने दो , अहिंसा हमारा नारा है मानव धम॔ प्यारा है ‘ भगवान महावीर स्वामी की जय ‘ चा जयधोष देवून भव्य शोभा यात्रा व तरुणांनी पथ – नाट्यातून अहिंसाचा संदेश देत महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

जैन धर्म स्थान्कात अहिंसा ध्वजा चे ध्वजारोहण केल्या नंतर भगवान महावीर स्वामी च्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर भव्य शोभायात्रेला सुरवात झाली अग्रभागी पारंपरिक बॅन्ड ,लाल साड्या परीधान केलेल्या महिला, अहिंसा रथ , भगवान महावीर व जैन साधुचा भुमिकेतील मुल व मुली ,सफेद वस्त्र परिधान केलेली पुरुष, अशी शिस्तबद्ध शोभायात्रा मारुती मंदिर प्रागंणात आली असता तेथे आनंद भक्ती मंडळाचा तरुण तरुणीनी भगवान महावीरांचा संपुर्ण जीवनावरील पथ नाट्या व्दारे अहिंसेचा संदेशाची शिकवण दिली मिरवणुकी चा समारोप विठ्ठल मंदिरात झाला

या ठिकाणी ह भ प संदीप महाराज देशमुख, ह भ प जलाल महाराज सैय्यद यांचे व्याख्यान झाले.मांची हिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अॅड शाळीग्राम होडगर,अॅड रोहीणीताई निघुते, सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे,उपसरपंच राहुल जऱ्हाड, जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांनी जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.या वेळी भाउराव कांगुणे,राजेंद्र गायकवाड, बाळकृष्ण होडगर, सुम्मतीलाल गांधी, धन्नराज गांधी , प्रकाश मुथ्था निलेश चोपडा, विलास भंडारी , प्रकाश मुथ्था,चंपालाल बोरा, संजय गांधी, पंकज नाके ,पंकज कोळपकर, स्वप्नील लुंकड ,अनिल पितळे, कैलास बिहाणी, अभिजीत गांधी, राजेंद्र लुणीया, ईश्वर भंडारी, अभिजित बिहाणी, योगेश रातडीया, सुम्मतीलाल रातडीया, वसंत गांधी ,प्रशांत गांधी, मनोज पटवा ,भगवान बोरा, आश्वीन मुथ्था, राजेंद्र भंडारी,प्रकाश गांधी,योगेश लुंकड, पपलेश लाहोटी,समीर गांधी,अमित गांधी,अमित भंडारी, निलेश रातडीया, विनित गांधी , नितीन गांधी, सागर रातडीया, केदार बिहाणी, बाळुजी बिहाणी,दिपक बोरा,प्रितम गांधी,किरण गांधी ,नंदकिशोर लाहोटी,रोहित भंडारी,सह अहिंसा प्रेमी उपस्थित होते.

यावेळी गौतमप्रसादीचे आयोजन अमरचंद स्वरुपचंद गांधी यांच्या वत्तीने करण्यात आले होते. स्वागत जैन श्रावकसंघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी प्रास्ताविक सुशील भंडारी यांनी केले या वेळी पुणे , लोणी , राहुरी , संगमनेर , वांबोरी अहमदनगर येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

