झरेकाठी : झुंजार न्यूज 


राहुरी तालुक्यातील सात्रळ ग्रामपंचायतीमधील . कारभाराची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असा आदेश गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी विस्ताराधिकारी टी. बी कोकाटे यांना दिला. ग्रामपंचायत मधील कारभार संदर्भात माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रमेश पन्हाळे यांनी गटविकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल गट विकास अधिकाऱ्यांनी घेत वरील आदेश दिला.

तक्रारीत ग्रामपंचायतीचा कारभार सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप पन्हाळे यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ,की विविध विकास कामांतर्गत गावातील पथदिवे, अंगणवाडीचे बांधकाम, स्मशान भूमीतील कामे यांचे उद्घाटन होणार आहे, मात्र, सदर कामाबाबत ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही, सदर कामाचे टेंडर मागवले की नाही, याबाबत मी अनभिज्ञ आहे. ही प्रक्रिया पूर्ण केली असेल तर सदस्यांना कळवण्यात आले नाही? त्यामुळे ही प्रक्रिया फक्त कागदोपत्री झाली असावी, अशी मला शंका येते. उपरोक्त उल्लेख केलेल्या कामाची रीतसर निविदा फेर प्रक्रिया राभावी, अशी माझी मागणी आहे,


गावठाण अंतर्गत रस्त्याच्या कामाबाबत असाच प्रकार झालेला आहे त्या कामाबाबत ग्रामपंचायत सदस्यांना किंवा गावकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही त्याबाबतही सखोल चौकशी करावी व जाहीरपणे प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आहे, प्रोसिडिंग वेळेवर लिहून ते सदस्या पुढे वाचून दाखवली जात नाही, ग्रामपंचायतच्या इतरही कारभाराची चौकशी करून नवीन ग्रामसेवकांना पदभार द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *