संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील खळी येथील गावाचे कुलदैवत खंडोबा देवस्थान परिसराचे सुशोभीकरण व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे कर्तबगार आमदार युवा नेते सत्यजित दादा तांबे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग विकास योजनेअंतर्गत 50 लाख रुपये निधी मंजूर झाल्यामुळे खळी येथील खंडोबा देवस्थान परिसराचा विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला .

खळी येथील खंडोबा देवस्थान हजारो भाविकाचे श्रद्धास्थान असून दाढ बुद्रुक धारणगाव मुंबई पुणे नगर नाशिक औरंगाबाद कल्याण ठाणे आधी विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक बघता असून या जिल्ह्यातून खंडोबा दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते याकरिता श्रीखंड व देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊन तसेच खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या परिसराचा कायापलट यामुळे होणारा असून सुशोभीकरण येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे श्री खंडोबा देवस्थान च्या सुशोभीकरणाकरता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी 05 मार्च 2023 रोजी पत्राद्वारे व ठरवाद्वारे केली होती आमदार तांबे यांच्या मागणीचा तात्काळ दखल घेत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 50 लाख रुपयांच्या निधी मंजूर करण्यात मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय 29 मार्च 2023 रोजी काढण्यात आला आहे त्यामुळे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचा परिसर फुलणार असून मंदिर परिसरातील विकास कामाला गती येणार आहे

नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवत विजयी झाली होते त्यानंतर आमदार तांबे यांनी मतदारसंघात लक्ष केंद्रित करत विकास कामे प्रश्न समस्या पर्यटन स्थळे देवस्थान शिवशोभीकरण आधी विषय प्रश्न बाबत संबंधित खात्याकडे त्यांनी पत्र व्यवहार केला होता दरम्यान सत्यजित तांबे आमदार हे खळी येथील खंडोबा देवाचे भक्त असून त्यांचे ते कुलदैवत असल्याने ते आमदार होतात त्यांनी 50 लाख इतका भरगोस निधी दिल्यामुळे आश्वी गटामधील खंडोबा देवस्थान परिसराचे शिवशोभीकरणाच्या माध्यमातून मोठा बदल घडून येणार असून या निधीमुळे खळी गावचे महत्त्व वाढणार असून श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून येणाऱ्या भक्तासाठी सुख सोयी पाणी रस्ता साईटकडे रुग्णवाहिका मंदिराचे बांधकाम सभागृह वृक्षारोपण मंगल कार्यालय आदी महत्त्वाचे विकास कामे यामुळे मार्गी लागणार आहे .

खळी गावच्या वतीने व आमदार सत्यजित तांबे यांनी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे राजहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र पा चकोर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर वाघमारे सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल कांगणे स्कूल कमिटीचे अध्यक्ष पाराजी पाटील चकोर उपाध्यक्ष चंद्रभान पाटील तांबे भोलेनाथ दूध संस्थेचे विद्यमान चेअरमन व विश्वस्त साहेबराव मुकिंदा पाटील तांबे श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लहानु नागरे विश्वस्त दत्तात्रय भानुदास नागरे सतीश संतु वाघमारे आदी सह खळी गावातील शेतकरी मंडळाचे कार्यकर्ते सूर्यभान सानप सुनील नागरे वेनुनाथ सानप पांडुरंग घुगे बाळासाहेब आव्हाड दिलीप तांबे राजेंद्र बाबुराव वाघमारे शिवाजी भिका वाघमारे मधुकर यमाजी वाघमारे दादा शंकर वाघमारे प्राध्यापक बाळासाहेब सुखदेव वाघमारे सर रावसाहेब काशिनाथ वाघमारे सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग विश्राम वाघमारे लहानुसंतू वाघमारे गोरख आनंदा नागरे गणेश पालवे आधीच गावातील नागरिकांनी आमदार सत्यजित तांबे दादांचा कौतुक केले आहे व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे
