संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील खळी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक 132 जयंतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती खळी यांनी दिली .
शुक्रवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता खळी गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे गावचे प्रथम नागरिक सरपंच विलास गजानन वाघमारे व गावातील इतर मान्यवर यांच्या हस्ते पूजन करण्यात येईल यानंतर खळी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई शाखेचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने परिसरातील गावांमध्ये मोटार सायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन व भेटी देणार आहे तसेच सायंकाळी पाच वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे रथामधून गावातील सर्व चौकामधून भव्य मिरवणूक काढणार असून शनिवार दिनांक 15 4 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक टीव्ही स्टार व कॅसेट गायक विलास शिरसाठ यांचा हिंदी मराठी व भीम गीताचा कार्यक्रम आयोजित केला असून रात्री आठ वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने खळी गावा सह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे . 
कोरोना एकल महिला यांना पैठणी साडी व अनाथ मुलांना शालेय कपडे व साहित्य जयंती समितीच्या वतीने वाटप करण्यात येणार आहे तरी सदर जयंती उत्सव समितीमध्ये गावातील नागरिकांनी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती खळी यांच्या वतीने करण्यात आले असून या दोन्ही दिवस नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे


