भ्रष्टाचारात प्रथम, बाल अत्याचारात दूसरा,  महीला अत्याचारात तिसरा तर गुन्हेगारीत चौथा क्रमांक
संगमनेर : झुंजार न्यूज
सुसंस्कृत व संतपरंपरेची शिकवण देणार्‍ या महाराष्ट्रात  बालक व महीलांवरील अत्याचारात  चिंता वाढवणारी वाढ झाली आहे. गुन्हेगारीने कळस गाठला असून ती  चौवथ्या क्रमांक तर भ्रष्टाचारात देशात पहीला क्रमांकावर असल्याचा राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था भारत सरकारच्या अहवालात म्हटले आहे
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील वाढती गुन्हेगारी खुपच चिंताजनक असून विशेषतः महीला व बालकांवरील अत्याचार सुसंस्कृत पणाचे धडे देणार्‍या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारे आहे. देशात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत चालली असून भारतातील महिलांवरील अत्याचारातील गुन्ह्याची संख्या चार लाख २८ हजार २७८ असून त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ३९ हजार ५२६ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांकाव आहे. देशातील बालगुन्हेगारीचा आलेख पाहता एक लाख ४९ हजार ४००४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यातील महाराष्ट्रात १७ हजार २६१ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बाल अत्याचारात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. भारतातील सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा विचार करता  एकूण ६० लाख ९६ हजार ३१० गुन्ह्याची नोंद झाली  असून त्यातील महाराष्ट्रामध्ये पाच लाख ४० हजार ८०० इतक्या गुणांची नोंद झाली आहे. देशात गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती आहे. सरासरीत तामिळनाडू प्रथम क्रमांकावर ,गुजरात द्वितीय व उत्तर प्रदेश तृतीय क्रमांकावरती आहे .उत्तर प्रदेशच्या  गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असल्याचे या अहलावरून समोर आले आहे.
भारतात एका वर्षात ३० हजार १३२ खुन्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यातील महाराष्ट्रात २ हजार ३८१ खुनांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांचा विचार करता महाराष्ट्रात एक लाख ५७७ गुन्हे घडले आहेत. संपत्ती विषयक गुन्ह्यांचा विचार करता महाराष्ट्रात ९१ हजार ८४२ इतके गुन्हे घडले असून या संघर्षात महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकावर आहे .सरासरी हे शेकडा प्रमाण १२ टक्के आहेत.
अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर झालेल्या अत्याचाराचे प्रमाण महाराष्ट्रात २ हजार ५०३ इतके असून सरासरी शेकडा प्रमाण ५ टक्के  इतके आहे. अनुसूचित जमातीवरील अत्याचारात देशात आठ हजार आठशे दोन गुन्हे दाखल झाले असून त्यातील ६२८ गुणांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेता ६ हजार १९० गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले असून हे सरासरी प्रमाण २४ टक्के आहे‌.ज्येष्ठांच्या अत्याचारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. आर्थिक गुन्हेगारीचा विचार करता महाराष्ट्रात १ हजार ५५० गुन्हे दाखल झाले असून ,देशातील सरासरीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरती आहे. आर्थिक गुन्ह्यात महाराष्ट्रात प्रमाण नऊ टक्के इतके आहे. देशात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद राजस्थानमध्ये करण्यात आले आहेत .भ्रष्टाचार व गैरकारभार यासंबंधी ३ हजार ७२५ गुन्ह्याची नोंद झाली असून त्यातील महाराष्ट्रात ७७३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती आहे. देशातील एकूण गुन्हेगारीचा विचार करता महाराष्ट्राचे हे प्रमाण सुमारे २१ टक्के इतके आहे.भारतात सायबर क्राईम मध्ये ५२ हजार ९७४ गुणाची नोंद करण्यात आली असून त्यातील महाराष्ट्रामध्ये पाच हजार ५६२ गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण सुमारे दहा दशांश पन्नास टक्के आहे. सायबर क्राईम मध्ये तेलंगणा, उत्तर प्रदेश व कर्नाटक हे प्रदेश आघाडी वरती आहेत. राज्या विरोधात कारवाई मध्ये भारतातील एकूण पाच हजार १६४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात केवळ २१८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत .या प्रकारात उत्तर प्रदेश ,तामिळनाडू आसाम व जम्मू-काश्मीर ,पश्चिम बंगाल हे राज्य महाराष्ट्र यापेक्षा आघाडीवर आहेत.
चौकट- महाराष्ट्रात गुन्हेगारी उंचावली
– महाराष्ट्र विविध प्रकारची गुन्हेगारी महाराष्ट्रात उंचावली असल्याचे अहवाल राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था भारत सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील महिला व बालकांच्या गुन्हेगारीत वरचा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्य विरोधातील कारवाई मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सहावा आहे. राजकीय अस्थिरता विचार करायला लावणारी असून अंतर्गत मतभेद वाढत चालले असून त्याचा सारा भार पोलिस व समाजावर होत आहे.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
कधी एकेकाळी महाराष्ट्राची ओळख शाहू ,फुले ,आंबेडकरांचा महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र असा केला जात होता. त्या महाराष्ट्राची ओळख आता हळू पुसत चालली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालानुसार जेष्ठांवरील अत्याचारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर  आहेत. संपत्तीवरील वादातील गुन्हे प्रकारात महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहेत. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावरती आहे.
 – गंभीरपणे विचार करण्याची वेळ
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचाराचा महाराष्ट्राचे प्रमाण अधिक राहिले आहेत. भ्रष्टाचार व गैवहारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर  आहे .त्यामुळे वाढते गुन्हेगारी लक्षात घेता अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहेत. काही वर्ष महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे आलेख उंचावत असल्याने समाजामध्ये अस्वस्थता वाढत असल्याचेही चित्र आहेत. यात राज्यातील राजकीय अस्थिरता अधिक गंभीर आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *