विद्यापीठे आणि जिल्हाधिकारी कार्यालयांसमोरही बुधवारी आंदोलन

मुंबई : झुंजार न्यूज 

 

विविध विद्यापीठे आणि बार्टीने पात्र ठरवूनही राज्य सरकारने फेलोशिपपासून वंचित ठेवलेले शेकडो संशोधक मुंबईच्या आझाद मैदानात गेला दीड महिना आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थी संघटना एकवटल्या असून येत्या बुधवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता
‘ विद्यार्थी संघटना संयुक्त समिती ‘ ने आझाद मैदानात ‘एकजूट मोर्चा’ आयोजित केला आहे.

 

या एकजूट मोर्चाची घोषणा सचिन मानवडकर (आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन),आशिष गाडे (रिपब्लिकन विद्यार्थी सेना),अमोलकुमार बोधिराज- भारतीय लोकसत्ताक संघटना),
रोहित ढाले ( छात्रभारती विद्यार्थी संघटना),
सिध्दार्थ इंगळे ( महाराष्ट्र स्टुडंट युनियन),
संदेश वाघचौरे (ऑल इंडिया पँथर सेना), दादाराव नांगरे (नॅशनल स्टुडंट युनियन), हर्षाली घुले ( मुंबई आयआयटी),ऍड. कैलास केदारे ( रिपब्लिकन विद्यार्थी संघ), प्रशांत दिवटे (राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना), विकास मोरे (सत्यशोधक विद्यार्थी संघटना) यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे रविवारी केली आहे.

बुधवारचे आमचे आंदोलन हे मुंबईतील मोर्चापुरते मर्यादित नसून राज्यव्यापी आहे. त्या दिवशी एकाच वेळी राज्यातील सर्व विद्यापीठे आणि सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर हे आंदोलन करण्यात येईल, असे विद्यार्थी संघटना संयुक्त समितीने जाहीर केले आहे.

‘सारथी’ तर्फे कुणबी- मराठा समाजातील संशोधकांना आणि ‘ महाज्योती’ तर्फे ओबीसी संशोधकांना सरसकटपणे फेलोशिप दिली जाते. मग बार्टीकडील अनुसूचित जातींच्या ८६१ संशोधकांच्या बाबतीतच हा दुजाभाव आणि ‘वेगळा न्याय’ कसा, सवाल दलित संशोधकांचा आहे.

डी लिट ही सन्मानाची पदवी मिळालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फेलोशिपचा विषय आपणांस माहित नाही, असे विधिमंडळाच्या भर सभागृहात सांगत आहेत. पण शेकडो तरुण संशोधकांना भेट देऊन हा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न दीड महिन्यात करत नाहीत. ही त्यांच्या सरकारची अनास्था, बेपर्वाई आणि संवेदनशून्यता आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

अनेक संघटनांचा पाठिंबा
——————
विद्यार्थी संघटनांच्या राज्यव्यापी आंदोलनाला आणि बुधवारच्या एकजूट मोर्चाला काही राजकीय पक्षांसहित अनेक सामाजिक, युवा संघटना आणि संस्थांनी शनिवारी झालेल्या एका बैठकीत सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

 

त्यात नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस,भीम आर्मी, जागृत भारतीय संघ,आंबेडकराईट्स ऍक्शन कमिटी, मी बुद्धिस्ट फाउंडेशन , महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन परिषद , बहुजन संग्राम, संविधान समर्थक दल,फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट ( फॕम ),भारतीय लोकसत्ताक संघटना ,युवक पँथर,मातंग समाज सेवा संघ, आंबेडकरी क्रांती दल, कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी महिला मंडळ,सिंधुदूर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघ मुंबई, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, बौद्ध संघर्ष समीती, महाराष्ट्र , सत्यशोधक बहुजन आघाडी, भारतीय समता संघ, महाराष्ट्र , रिपब्लिकन बहुजन आघाडी, महाराष्ट्, रिपब्लिकन पाॅलिटीकल फ्रेन्डशीप फ्रन्ट, महाराष्ट्र , विद्रोही आंबेडकरी जलसा , रिपब्लिकन मजदूर संघ,मानवहित लोकशाही पक्ष , डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना (नागपूर), डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रेजुएट स्टूडेंट् असोसिएशन( पुणे), सत्यशोधक विद्यार्थी संघटना , सिनेट परिवर्तन पॅनल( नागपूर ), अभ्यासिका विद्यार्थी कृती समीती, जनांदोलनाचा राष्ट्रीय समन्वय- महाराष्ट्र, मानवी हक्क अभियान, संविधान सैनिक संघ ,संविधान विद्यार्थी सेना, समता सैनिक दल , सम्यक मैत्री संघ, तथागत बहुउद्देशीय संघ,रिपब्लिकन पार्टी आँफ इंडीया(आर के) ,भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटना,कोकण युवा आदींचा समावेश आहे.

 

मागण्या काय आहेत?
—————–

१) बार्टी मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (BANRF- 2021) अंतर्गत सर्व ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृती (फेलोशिप) मंजूर करण्यात यावी.
२) UGC च्या fellowship Guidelines नुसार बार्टी मार्फत BANRF 2019-20 च्या संशोधक विद्यार्थ्यांना m.phil To PHD. साठी नियमित पाच वर्षे अधिछात्रवृती देण्यात यावी.
3) UGC च्या fellowship Guidelines नुसार बार्टी मार्फत BANRF -2018 च्या PHD संशोधक विद्यार्थ्यांना पाच वर्षे अधिछात्रवृती देण्यात यावी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 

आपले विनीत

■ *रोहित ढाले* ( 8291503650)
छात्र भारती

■ *आशिष गाडे* (9987277081)
रिपब्लिकन विद्यार्थी सेना

■ *आनंदराज घाटगे* (7083947946)
डॉ आंबेडकर नॅशनल स्टुडंट्स असोसिएशन

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed