तालुक्यात विविध ठिकाणी जयंती साजरी

संगमनेर : झुंजार न्यूज 

उपेक्षितांच्या उद्धारासाठी  आयुष्यभर संघर्ष करणारे व प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेच्या माध्यमातून समतेचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचे मानबिंदू असल्याचे गौरवोद्गार माजी कृषी व शिक्षणमंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे .

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व राष्ट्रीय दलित पॅंथर संगमनेर तालुका यांच्यावतीने आयोजित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. आ डॉ. सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,उत्कर्षाताई रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी आर कदम, श्रीमती कुसुमताई माघाडे ,सुधाकरराव रोहम, हिरालाल पगडाल, विश्वासराव मुर्तडक ,किशोर टोकसे ,रामहरी कातोरे ,नवनाथ आरगडे, अजय फटांगरे ,शिवसेनेचे अमर कतारी, सिताराम राऊत, गौतम गायकवाड, प्रा शशिकांत माघाडे, ॲड. अमित सोनवणे, दलित पॅंथरचे राजू  खरात ,प्रवीण गायकवाड, रवींद्र गिरी, प्रकाश वाघमारे, संदीप दळवी, आधी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आ. थोरात म्हणाले की, चातुरवर्ण व्यवस्थेविरुद्ध प्रथम गौतम बुद्ध यांनी लढा दिला असून हा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला. संत महात्म्यांचे समानतेचे विचार , तत्त्वज्ञान त्यांनी राज्यघटनेत  एकत्र करून देशाला संविधान  दिले आहे.


भारत हा विविध भाषा, वेशभूषा असलेला देश आहे. या सर्वांना एकत्रित ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. हि संविधानाचे तत्व जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मात्र काहीजण संविधानाची शपथ घेऊन राज्यघटनेच्या तत्त्वांच्या विरुद्ध विचार मांडत आहेत. जातीभेद निर्माण करून राजकारण करत आहेत. एका समाजाचे राज्य निर्माण करण्याचे विधाने हि अत्यंत दुर्दैवी असून सर्वांच्या विकासाचा व समतेचा असलेला राज्यघटनेचा विचार हाच शाश्वत विचार आहे.

या विचाराला ताकद दिली पाहिजे.  काळ कठिण आहे, संघर्ष करावा लागणार आहे .मात्र देशाच्या हिताकरता आपण लढत आहोत आणि म्हणून समतेचे तत्त्वज्ञान असलेल्या विचारांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहवे असे आवाहनही त्यांनी केले

तर मा.आ. डॉ तांबे म्हणाले की , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिशा देण्याचे काम केले असून आपल्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब, दलित ,शोषितांच्या उद्धारासाठी केला आहे. लोकशाहीमुळेच सर्वांसाठी विकासाच्या वाटा खुल्या झाला आहे. इतिहास ,तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा विविध विषयांचे गाढे अभ्यासक असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य पुढील  पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे .

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, समाजाच्या विकासासाठी शिक्षणाचा मूलमंत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकरावे असे आवाहन केले. याप्रसंगी उत्कर्षताई रुपवते, श्रीकांत माघाडे, सुधाकरराव रोहम, बि. आर कदम यांचीही भाषणे झाली यावेळी सुरेश थोरात, शिवाजी जगताप, ज्ञानेश्वर राक्षे, सुरेश झावरे ,जीवन पांचारिया, प्रा बाबा खरात आदींसह विविध कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय घोसाळे यांनी केले सूत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी केले तर प्रा शशिकांत माघाडे यांनी आभार मानले.

चौकट

विविध ठिकाणी जयंती साजरी

संगमनेर तालुक्यात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, यशोधन जनसंपर्क कार्यालय, जोर्वे ,राजापूर, वडगाव पान यांसह संगमनेर शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या जयंती महोत्सवास आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात यांनी भेट देत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले


पुस्तक प्रदर्शन व रक्तदान शिबिर



डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवात विविध विषयांच्या पुस्तकाचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते तसेच यावेळी रक्तदान शिबिरात अनेक तरुणांनी रक्तदानही केले
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *