संगमनेर : झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पुर्व पठार भागाच्या माळरानावरील शेतकऱ्यांच्या फायदाकरिता श्री गजानन महाराज शुगर कारखाना उभा करत राजकारण न करता व बदनामी करणार्‍या शक्तीकडे दुर्लक्ष करत प्रामाणिक पणाने शेतकऱ्यांच्या हिताकरिता काम करत असल्याने या गळीत हंगामातील शेतकऱ्यांच्या कष्टाचा एक ही रुपया मागे न ठेवता १० मे पर्यंत पेमेंट देणार असल्याचे आवाहन श्री गजानन महाराज शुगर कारखान्याचे अध्यक्ष रविंद्र बिरोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्रारे व्यक्त केले .  
यावेळी प्रसिद्धी पत्रकात रविंद्र बिरोले पुढे म्हणाले की , २०१६ – १७ साली कौठे – मलकापूर येथील खडकाळ माळरानावर शेतकऱ्यांच्या हिताकरिता शुगर कारखाना उभारणीचा निर्णय घेतला . सुरुवातीच्या काळात फार अडचणी आल्या मात्र राजकारण न करता प्रामाणिकपणाने ठाम उभा राहिल्याने शेतकऱ्यांच्या विश्वासाने व सहकार्याने यश आले पहिले दोन गळीत हंगाम व्यवस्थित झाले तिसर्‍या हंगामा दरम्यान दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ऊस उत्पादन कमी झाले यामुळे सर्वचं कारखान्याना फटका बसला . मात्र पुढील दोन गळीत हंगामात उंच्चाकी गाठल्याचे समाधान लाभले . वैजापूर , गंगापूर सारख्या लांब पल्ल्यावरून नफ्या, तोट्याचा विचार न करता ऊस वाहतुक केली केवळ शेतकऱ्यांनी विश्वास दाखविल्यामुळे . यावर्षीचा गळीत जेमतेम झाले मात्र आता पर्यंत शेतकऱ्यांचे ७५ % पेंमेंट आपण बँकेत वर्ग केली असून राहिलेले पेमेंट अचानक झालेल्या व्हायरस मुळे माझी तबेत बिघडल्यामुळे गळीत हंगामाच्या समारोपास उपस्थित राहता आले नसल्यामुळे विरोध शक्तीने विनाकारण बदनामी सुरु केली मात्र कारखाना व शेतकर्‍यामध्ये एक विश्वासहर्ता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी धीर धरत वाट पाहीली . 
काही शेतकरी संघटनेकडे गेली मात्र आजपर्यत कोणत्या संघटनेपासून शेतकऱ्यांना फायदा झाला . बहुतांश कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन – तीन वर्ष पैसे दिले नाही यांचे उदाहरण आहे मात्र आपणास राजकारण करायचे नाही केवळ शेतकऱ्यांचा फायदा बघायचा आहे . श्री गजानन महाराज शुगर कारखाना हा शेतकऱ्यांचा असून शेतकरी आमचाचं आहे . आतापर्यंत शेतकऱ्यांचा या मागील गळीत हंगामाचा रुपया ठेवला नाही या हंगामातील ७५ % पेमेंट दिली आहे मात्र शिल्लक राहिलेली रक्कम ही केवळ आजारपणामुळे विलंब लागला मात्र येत्या २५ एप्रिल ते १० मे पर्यंत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट दिले जाईल असे आवाहन रविंद्र बिरोले यांनी केले आहे 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *