संगमनेर : झुंजार न्यूज
महामानव भारतरत्न तथा घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबवून डीजे, मिरवणूक, रोशनाई यासारख्या गोष्टी टाळून संगमनेर शहरात असणाऱ्या बालगृह संगमनेर (रिमांड होम) या ठिकाणी अनाथ गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करून तसेच मिठाई वाटप करून अनोख्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला.

खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी शिक्षण व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी प्रोत्साहन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या विद्यार्थ्यांसोबत जयंती साजरी करत असताना खऱ्या अर्थाने मनाला समाधान वाटले. हा सामाजिक उपक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका कार्याध्यक्ष विजयराव खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोडे, तालुका सचिव जनार्दन साळवे, संघटक मधुकर सोनवणे, एडवोकेट रवी शेळके, पप्पू रोकडे, विजय मंतोडे, रोहिदास उंडे, शिपलापुरचे उपसरपंच दिलीप मुन्तोडे, रमेश भोसले, महिला तालुकाध्यक्ष रुपालीताई सोनवणे, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ खरात, शरद जमदाडे, आत्माराम आडंगळे, रवी रोकडे, योहान मिसाळ, राजू वाघमारे, विकास गायकवाड, प्रकाश वाघमारे, रवींद्र शेळके, अशोक शेळके, दिनकर शिंदे, सनी लोंढे, प्रतीक शेळके, अभिषेक शेळके, ऋतिक शेळके आदी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडला.
Post Views: 163
