संगमनेर : झुंजार न्यूज
वडीलोपार्जीत राजकिय वारसा लाभलेल्या एक संधन व सर्व सामान्य कुटुबांतील कणखर व आक्रमक स्वभावाने स्वतःच्या कर्तुत्वाच्या जोरावर राजकारणात वेगळा ठसा उमटविणारे ‘ तात्यासाहेब ‘ आश्वी नव्हेतर संपूर्ण तालुक्यात परिचित असणारे माजी संरपच विठ्ठलराव मारोतराव गायकवाड पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसा निमित्ताने एक उजाळा . . .
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील तात्यासाहेब यांना सामाजिक व राजकारणाची आवड असल्याने आपल्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने स्वकर्तृत्त्वातून गावापातळी वरील विविध संस्थामध्ये काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचे सर्वसामान्य माणसाकरिता उपयोग केल्यानेचं एक स्वतंत्र वलय निर्माण केल्याचे चित्र दिसत असून सामाजिक दायित्वातून लोकांची सेवा करता यावी म्हणून रंभाबाई फाऊंडेशन स्थापना केली .आपल्या ६० वर्षाच्या जीवनात कसे जगले यापेक्षा कोणासाठी जगले हे तात्यासाहेब या टोपन नावांनी लक्ष्यात येत आहे .समाज्यातील प्रत्येक घटकाला आपल्या पासून मदत व्हावी ही त्यांची मनापासून सातत्याने इच्छा असते . येणाऱ्या – जाणार्याची अस्तेने विचारपूस करत पाणी घ्या , चहा घ्या असे म्हणाऱ्यात तात्यासाहेब आश्वी परिसरात अग्रेसर दिसत आहे .

विखे असो या थोरात असो यांच्याशी त्यांचे चांगले संबंध राहिले .राजकारणात चढ उतार चालूचं असतो मात्र तात्यासाहेबांनी समाजकारणाला जास्त महत्त्व दिले . काही काळ पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिल्याने शेतकऱ्यांविषयी विविध भेडसावणारे प्रश्न , समस्या त्यांनी नेतृत्वापुढे परखडपणे मांडले . तर गावांच्या संरपचपदी असताना गावांच्या विकासाला प्राधान्य देत सर्व सामान्य माणसांना सुद्धा न्याय देण्याचे काम केले . तर संगमनेर तालुका दूध संघावर सुद्धा त्यांना काम करण्याची संधी मिळाली . वडीलोपार्जीत सुसंस्कृत कुटुबांतून व आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्वामुळे कुटुबांतील मुलं – मुलीवर सुसंस्कृत संस्कार घडले उच्च शिक्षित झाले . ” पतीच्या यशात पत्नीचा मोलाचा वाटा असतो त्यानुसार प्रपांच्यात पत्नी मंगल हीने सुख – दुःखात तात्यासाहेब धीर देत मोठी साथ दिली . आज विठ्ठलराव मारोतराव पाटील गायकवाड उर्फ तात्यासाहेब यांना ६० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

” वाढदिवस एका वादळाचा , वाढदिवस एका धगधगत्या निखाऱ्याचा , वाढदिवस एका असामान्य कार्यकर्त्याचा ,वाढदिवस एका सच्चा मित्राचा ,वाढदिवस एका रुबाबदार व्यक्तीमत्वाचा ” !
आश्वी व परिसरातील मित्र मंडळ
