संगमनेर : झुंजार न्यूज
अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील पोलिस पाटील विठ्ठल यादव आंधळे यांच्या शेतातील दोन नारळीच्या झाडावर शुक्रवारी सायंकाळी वीज पडली .या दोन्ही नारळीच्या झाडापासून अवघ्या काही अंतरावर आंधळे यांचे घर व जनावरांचा गोठा होता मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला .
याबाबत माहिती अशी कि , आश्वी – लोणी रस्त्यालगत प्रतापपूर प्रतापपूर शिवारातील गट नं ६३ मध्ये विठ्ठल आंधळे यांची वस्ती व जनावरांचा गोठा आहे . शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रतापपूरसह परिसरात वीजेच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस सुरु झाला होता . विठ्ठल आंधळे यांच्या शेतातील असणार्या दोन नारळावर कडकडाट आवाज देत वीज कोसरळी क्षणाचा विलंब न होता नारळाच्या झेंड्यानी पेट घेतला .

यावेळी झाडापासून काही अंतरावर आंधळे यांचे घर व जनावरांचा गोठा असून यात लहान – मोठ्यासह पंधरा जनावरे व कुटुंबातील सदस्य होती . मात्र कुठल्यापैकी घटना न होता मोठा अनर्थ टळल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी अजून तीन दिवस धोक्याचे वर्तविले जात आहे .

चौकट
प्रतापपूर व देवगांव मध्ये मागे – पुढे मात्र नारळाच्याचं झाडावर वीज पडल्याने आश्चर्य व्यक्त होत असून दोन्ही गावांतील वीज पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे दोन्ही नारळाच्या झाड्याच्या शेंड्यावर पेट घेतलेला दिसत आहे .

