संगमनेर : झुंजार न्यूज
मागील दोन ते तीन वर्षापासुन संगमनेर तालुक्यात विशेषत्वाने ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे. याच अनुषंगाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी प्रारंभीच्या काळातच काळजी घेतली तर भविष्यात होणान्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो. हुमणीच्या जीवन क्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनी बाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करणे गरजेचे असते.

वळवाचा किंवा मान्सूनचा पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभुळ, कडुलीब, बोर या झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी गोळा होतात. त्यामुळे आपले शेताच्या बांदावरील बाभुळ, कडुलीब, बोर या झाडांचा आत्ताच डहाळा करावा. रात्री काठीच्या सहाय्याने फांद्या हलवून खाली पडलेले प्रौढ भुंगेरे गोळा करून किटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकुन मारणे, अशा झाडांवर शक्य झाल्यास किटक नाशकाची फवारणी करणे. मोठ्या प्रमाणात भुंगेऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे लावणे, उन्हाळी शेताची नांगरट करून जमिन तापू द्यावी. उभ्या पिकात निंबोळी पेंडीचा वापर प्रती एकरी २ मे. टन करावा, शेणखतातील हुमणी अळीचे नियंत्रण करण्यासाठी बी. व्ही. एम. या किटकनाशकांचा २ लिटर प्रती एकर वापर करावा. रासायनिक पद्धतीने उभ्या पिकातील हुमणी किडीचे नियंत्रणासाठी ०.३% दाणेदार (रिजेंट) फिप्रोनील एकरी १० किलो किंवा लेसेंटा हे किटक नाशक प्रती एकरी १५० ग्रॅम किंवा २०% क्लोरोपाय्रीफोक्झ प्रती एकरी १ लिटर ३०० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेचिंग करावे. मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. इत्यादी उपाययोजना शेतकऱ्यांच्या सहभागातुन सामुदायिकरित्या करण्याचे आव्हान सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओहोळ यांनी केले.
यामुळे अंडी घालण्यापूर्वी गेल्यांचा नायनाट करणे शक्य होणार आहे. हुमणी अळीचा पुढील कालावधीत दिसणारा प्रभाव कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. हुमणी ही बहुभक्षी किड असून तो आगामी हंगाम घेण्यात येणान्या ऊस, सोयाबीन, भुईमुग, गहु, हरभरा व भाजीपाला पिके इत्यादी वर उपजिविका करू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पुढील नुकसान टाळण्यासाठी शक्य होईल, तितक्या लवकर सामुदायिक पद्धतीने प्रतीबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हुमणी नियंत्रण करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकन्यांनी उत्फुर्त सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी कारखान्याचे ऊस विकास विभागाशी संपर्क करावा, असे आव्हान कारखान्याचे चेअरमन यांनी केले आहे.
