दंडकारण्य अभियानातून
संगमनेर तालुक्यात वटसावित्री पोर्णिमेनिमित्त प्रत्येक गावात वटवृक्षाचे रोपन
संगमनेर : झुंजार न्यूज
हरित सृष्टी सह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणार्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत वटसावित्री पौर्णिमे निमीत्त संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर शनिवार दि.03 जुन रोजी वटवृक्षांचे रोपन करण्यात येणार असून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या अभियानाचे हे 17 वे वर्ष पूर्ण झाले आहे. मा.महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब, डॉ सुधीर तांबे व प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे व सौ.कांचनताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान लोकचळवळ झाले आहे. वृक्ष जोपासणार्या या जयहिंद लोकचळवळ देशपातळीवर लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा या चळवळीचे यश आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे. भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा असणार वटपोर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष, रुई, उंबर, पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सीजन निर्माण करतात. म्हणून असा हा वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी जयहिंद लोकचळवळ च्या वतीने दंडकारण्य अभियान अंतर्गत प्रत्येक गावात व वाडीवस्तीसाठी 1100 वटवृक्षाचे रोपे देण्यात आली आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनीच्या हस्ते या झाडाचे रोपन करुन त्याच्या पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात आली आहे. यामुळे हिरवीगार सावली, परिसराचे वैभव, आयुर्वेद, पूजापाठ व सजीवांसाठी शुद्ध ऑक्सीजन मिळणार आहे. पर्यावरणाचा र्हास होत चालल्याने ग्लोबल वॉर्मिगची समस्या उभी राहून उन्हाळ्याात लहान, मोठ्या सजिवांना जगणे असाह्य झाले आहे. म्हणून तीर्थरूप दादांनी सुरु केलेल्या दंडकारण्य अभियान हे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ ठरली आहे. प्रत्येक महिलेने एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे.

