कोपरगाव : झुंजार न्यूज
  भले आपले कितीही राजकारण असले तरी ते आपापल्या ठिकाणी पण शेतक-यांच्या संस्थेत त्यांच्या उन्नतीसाठी राजकीय जोडे बाजुला ठेवुन कार्यरत रहायचे हा कर्मवीर स्व. शंकरराव काळे व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा मुलमंत्र दुस-या पिढीतही कायम राहिला माजी आमदार अशोकराव काळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव बाजार समितीची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सतत पुढाकार घेतला आणि हया निवडणुका आजवर बिनविरोध घडविल्या आहेत, चालु पंचवार्षीक निवडणुकही बिनविरोध करण्यांसाठी आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी पुढाकार घेवुन निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत आहे. 
शेतक-यांबरोबरच सहकारी संस्था टिकल्या पाहिजे त्यातून सर्वांचा उत्कर्ष, विकास झाला पाहिजे ही भावना या तालुक्याचे नेते काळे व कोल्हे यांची राहिलेली आहे त्यासाठी त्यांनी वेळोवेळी राजकीय जोडे बाजुला ठेवुन खंबीर भूमिका घेतली आहे. 
गेल्या तीन वर्षापासुन कोरोना परिस्थितीमुळे आर्थीक परिस्थिती दोलायमान झालेली आहे, सर्वांसमोर काही ना काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याला प्रत्येकाने आपापल्या परिने तोंड दिलेले आहे. कोपरगांव बाजार समितीची निवडणुक नुकतीच जाहिर होवुन त्यासाठी सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 
 बाजार समिती ही शेतक-यांची संस्था असुन ती टिकली पाहिजे, त्यात कुठेही राजकारण येता कामा नये, त्यातुन शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न व्हावेत याच उददेशांने आजवर सत्तारूढ संचालक मंडळाने पुढाकार घेवुन काम केले आहे.
 कोपरगांव बाजार समितीत पहिले अडीच वर्षे कोल्हे गटाचा सभापती तर काळे गटाचे उपसभापती व नंतरच्या अडीच वर्षात काळे गटाचा सभापती तर कोल्हे गटाचे उपसभापती कारभार पाहणार आहेत. ही निवडणुक बिनविरोध घडविण्यांत सर्वच तोलामोलाचे उमेदवार साथ देत आहेत. औताडे व परजणे गटाच्या नेतृत्वांनेही त्यात सकारात्मकता दाखवत सर्व त-हेने सहकार्य देत आहे. ही निवडणुक बिनविरोध होण्यांसाठी उर्वरित इच्छुक अपक्ष उमेदवारांनीही माघार घेवुन जिल्हयाच्या राजकारणात कोपरगांव बाजार समिती निवडणुक बिनविरोध घडवून शेतक-यांच्या उत्कर्षासाठी मोकळया मनांने साथ द्यावी असे आवाहन सर्वश्री. नितीनराव औताडे, साहेबराव रोहोम, खंडेराव फेफाळे व माधवराव खिलारी यांनी संयुक्तरित्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed