संग्राम मतिमंद विद्यालयात पालक मेळावा संपन्न
संगमनेर : झुंजार न्यूज
डॉ देवेंद्र निवासी मतिमंद विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात त्या बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक चांगदेव खेमनर ,सौ सुनंदा गुंजाळ, सौ प्रियंका दिघे आदी उपस्थित होते .
या प्रसंगी बोलताना नंदकुमार फुले म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम निवासी मतिमंद विद्यालयाने अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत भरीव काम केले आहे. अपंग व्यक्ती ह्या विशेष व्यक्ती असून त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याकरता या विद्यालयाच्या माध्यमातून जागृती केली जात आहे. शासनाच्या विविध योजना असून या व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे .याकरिता संग्राम विद्यालय व संगमनेर मधून होणारा पाठपुरावा कौतुकास्पद असल्याची ते म्हणाले
तर प्रियांका दिघे म्हणाल्या की, मुलांचे संगोपन, बौद्धिक क्षमता, याबाबत पालकांना अधिक माहिती असते .आपल्या मुलांची योग्य काळजी घेण्याबरोबर शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांचा जीवनात संपन्नता कशी येईल यासाठी त्यांनी काम करावे असे आवाहन ही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चांगदेव खेमनर यांनी केले सूत्रसंचालन भाऊसाहेब नरवडे यांनी केले तर भालेराव सर यांनी आभार मानले यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
