संगमनेर : झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी खुर्द येथील हनुमानवाडी मधील असणाऱ्या ‘ न्याय ‘ डेअरी संचालित गीते मिल्क ॲण्ड ॲग्रो प्रोडक्टस् च्या माध्यमातून ” दूध व्यवसायातील गैरसमज व त्यावरील होणारे तोटे “ याविषयावरील चर्चासत्राचे रविवार दि . २३ एप्रिल २०२३ सायंकाळी ७ वाजता आयोजित केल्याची माहिती न्याय डेअरीचे व्यवस्थापक सागर गीते यांनी दिली .

यावेळी ग्रामिण भागातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांची दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणात रुचि वाढलेली दिसून येत आहे . शेती करताना कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी अवकाळी पावसाचा तडाखा त्यात शेती मालाला हमी भाव नसल्याने कधी कधी कवडी मोल शेत मालाला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग दूध व्यवसायाकडे वळाले . शेतकऱ्यांच्या जीवनात दूध व्यवसायातून आर्थिक क्रांती होत आहे . मात्र अजूनही दूध व्यवसायातील समज – गैरसमज शेतकऱ्यामध्ये दिसून येत असल्याने राहाता – राहुरी – संगमनेर या तालुक्यातील गावांमधील दूध व्यवसायाच्या अडी – अडचणी ओळखून ‘ दूध व्यवसायातील गैरसमज व त्यावरील होणारे तोटे ‘ या विषयावरील किसान फिल्डसचे चेअरमन चंद्रशेखर जगताप यांच्या उपस्थितीत व ‘ डॉ विशाल पारखे ‘ या व्याख्यातेच्या मार्गदर्शनाने चर्चा सत्राचे रविवारी दि . २३ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी न्याय डेअरी हनुमानवाडी आश्वी खुर्द येथे आयोजन करण्यात आले आहे .
तरी आश्वी , शिबलापूर , पानोडी , शेडगांव , पिंप्री लौकी अझमपूर , खळी , दाढ , झरेकाठी , मालुंजे , हंगेवाडी , ओझर , रहिमपूर , निमगांव जाळी , उंबरी , प्रतापपूरसह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी , दूध व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सागर गीते यांनी केले आहे
.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed