संगमनेर : झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील वरवंडी गावांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे उपसंरपचासह सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कारभार चालवितात. तसेच मासिक मिटींग न घेत्याचं मिटींगचे मस्टरवर सह्या घेतल्या जात असून कुठल्याही विकास कामांना चालना मिळत नसल्याचा आरोप उपसंरपचासह सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे लेखी पत्र संगमनेर गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या विविध विकास कामाकरिता सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. कामाबद्दलची कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने जागा निश्चित करून ले-आऊट दिले जाते. महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करून सदस्यांची मानहानी करतात. गेल्या सहा महिन्यात ग्रा.पं.च्या मासिक सभा झाल्याचं नाही . मासिक मस्टरवर सहा महीन्यांच्या सह्या घेतल्या जात आहे तर मासिक सभेतील सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा उपयोग ठराव संमतीत दर्शवून सरपंच व ग्रामसेवक कामकाज करीत असल्याचा आरोप केला आहे.

छोट्या – छोट्या विकासकामासाठी जागा निश्चिती व ले-आऊट देण्याचे काम स्वमर्जीने मासिक सभेत ठराव न घेता करण्यात येत आहे . १५ वा वित्त आयोगासह गेल्या २ वर्षाचा विकास निधी पडू आहे संरपच ताई ह्या पुणे येथे तर ग्रामसेवक हे संगमनेर ला राहतात . ग्रामसेवकांना तीन गांवे असल्याने आडवड्यातुन एक दिवस गावांला मिळत आहे गाव हे विविध विकास कामा पासून वंचित आहे . उपसंरपच व सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही . यांची वाऱ्यावरचं वरात दिसत आहे

चौकट – १ )

वरवंडी ग्रामपचायतीच्या मी उपसंरपच आहे हाच विश्वास बसत नाही . कारण गावांच्या विकास कामाकरिता आम्हाला विश्वासात घेतले जात नाही ग्रामपचायतीचे अनेक कामे रेंगाळेलेली आहे

सौ पोर्णिमा नवनाथ भोसले ( उपसंरपच ‘ वरवंडी )

चौकट – २ )

सन २००९ ची पुर्नावृत्ती होण्याची स्थिती संरपच , ग्रामसेवक बाहेर गावी असल्याने व उपसंरपच व सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने ग्रामपचायतचं राम भरोसे दिसत आहे

सर्व सदस्य , ग्रा प वरवंडी 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed