संगमनेर : झुंजार न्यूज
f
समाज्याच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेवून राज्यात नव्हे तर देशात एकलव्य आदिवाशी बहुजन पार्टी वाढविण्याकरिता काम केले तर कार्यकर्त्याला सक्षम बनविले भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकामध्ये निवडणुक लढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी उपलब्ध करुन देणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी सागितले .

संगमनेर तालुक्यातील चिंचपूर फाटा येथील मातोश्री मंगल कार्यालयात एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचा वर्धापन दिनानिमित्ताने झालेल्या मेळाव्यात जाधव बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हारचे पोलिस पाटील राजेंद्र बर्डे हे होते .

यावेळी प्रदेशाध्यक्ष भाऊराव माळी , पी आय जाधव, डाॅ आहेरे (सिन्नर), बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शाम गोसावी , सुभाष हळनोर , आडगावच्या संरपच .सौ पूनमताई सुनिल बर्डे , सौ चांदणे मॅडम , देवीदास पवार , दिलीप बर्डे , डाॅ. मच्छींद्र निकम , अॅड दिघे , बाबासाहेब तांबे आदीसह संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी काही मान्यवर कार्यकर्त्यानी एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षामध्ये प्रवेश केला. तर अनेक मान्यवर वक्त्यांनी पक्षाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत. पुढील काळात पक्षाचे ध्येय धोरणे , पक्ष बळकटी , कार्यकर्त्याच्या अडी अडचणी , या बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हळनोर यांनी केले .
