संगमनेर : झुंजार न्यूज
विद्यार्थी विद्यार्थीदशेत अनेक प्रकारचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करतात. आपल्या प्रतिभेच्या बळावर आपल्या आवडत्या शेत्रात उज्वल कामगिरी बजावतात. महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, औद्योगिक माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात महाविद्यालयाचा ठसा उमटविताना दिसत आहे असे मत सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी व्यक्त केले.

एस.एम.बी.एस.टी महाविद्यालयात शनिवार दि,२९/०४/२०२३ रोजी भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महाविद्यालयातील बहुसंख्यमाजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजलीदेऊन करण्यात आली. उपस्थित यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतानी आपल्या काही अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला. आपल्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले व आपल्या यशस्वी जीवनाचे श्रेय आपल्या शिक्षकांना व महाविद्यालयाला दिले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे सह-सचिव आ. दत्तात्रय चासकर, रजिस्ट्रबाबुराव गवांदे, अॅड. उदय ढोमसे (अध्यक्ष,संगमनेर वकील संघ) प्रगतशील शेतकरी नानासाहेब वाघ, यशस्वी उद्योजक किशोर क्षत्रिय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उप-प्राचार्य प्रा. शिवाजी नवले, उप-प्राचार्यप्रो.डॉ.बाळासाहेब वाघ, नितीन पानसरे, कौशल्य दळे, मुख्याध्यापिका शालिनी आंबरे, नॅक समन्वयक डॉ. लक्ष्मणघायवट, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व परिचय माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षांचा सत्कार, माजी विद्यार्थी संघाचे सचिवश्री.सचिन आहेर यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. लक्ष्मण घायवट यांनी केले. सूत्र संचालन प्रा. स्नेहल थिटमे यांनी केले. कार्यक्रम आनंदाच्या व खेळीमेळीच्या वातावरण मध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाचे अत्यंत नीटनेटके आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनानाथ पाटील उपप्राचार्य शिवाजी नवले तसेच या समितीचे सर्व सदस्य क प्रोफेसर व्ही.बी बैरागी प्राध्यापक लक्ष्मीकांत दळवी प्राध्यापक गणेश थोरात प्राध्यापिका वर्षा सावंत प्राध्यापिका स्नेहल थेटमे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले
