कोपरगाव : झुंजार न्यूज
  जिद्द कष्ट आणि आई-वडिलांनी सोसलेले हलाखीचे जीवन बदलवण्यासाठी तालुक्याच्या पोहेगाव परिसरातील शहापूर येथील गायत्री व अश्विनी बाबासाहेब घारे या दोन मुलींनी कष्टाचे सोने करून महाराष्ट्राच्या  पोलीस दलामध्ये पदार्पण करून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
 कु. गायत्री घारे आणि कु. अश्विनी घारे या दोघी शहापूर (ता. कोपरगाव) येथील शेतकरी बाबासाहेब घारे यांच्या कन्या असून, त्यांची पुणे शहर पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल या पदासाठी निवड झाली आहे. या दोन्ही भगिनींनी जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर व अडीअडचणीवर मात करत हे नेत्रदीपक यश मिळवून कोपरगाव तालुक्याचा लौकिक वाढविला आहे.  संजीवनी उद्योग समूह तसेच पोहेगाव पतसंस्थेच्या वतीने या दोघीं बरोबरच बहादराबादच्या  राजेंद्र पाचोरे यांची कन्या कु.प्रतीक्षा हिची पिंपरी चिंचवड पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार  केला. 
  ग्रामीण भागातील मला_मुलींनी प्रशासकीय सेवेत यश मिळवावे यासाठी माजी मंत्री स्व.  शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केले.
 सौ.  स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अशा काळात ग्रामीण भागातील मुला-मुलींनी मनात कसलाही न्यूनगंड न बाळगता जिद्द व अभ्यासात सातत्य ठेवून प्रयत्न करावेत. शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते. 
  याप्रसंगी पोहेगाव ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन औताडे, नितीन पाचोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, प्रवीण घारे, भाऊसाहेब घारे, अमोल घारे, दत्तात्रय पाचोरे, सागर घारे, सतीश घारे, वसंत घारे, अप्पासाहेब घारे, अविनाश घारे, समाधान डांगे, अभिजीत पाचोरे, गणेश खंडीझोड, अण्णासाहेब खंडीझोड, शरद पाचोरे, रवींद्र घारे, राहुल घारे आदी उपस्थित होते
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed