संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे बुद्ध जयंती उत्सवानिमित्ताने गावातून सम्यक धम्मरथाची भव्य शोभायात्रा काढली आली या शोभायात्रेत सजवलेल्या रथामध्ये तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या असल्याने रथाचे स्वागत महिलांनी औक्षण करत लोककल्याणाची सुमधुर मंगल धून लावून पृष्पवृष्टी करण्यात आली .

या धम्मरथ यात्राची पांढऱ्या शुभ्र पोशाखात महिला , पुरुष दोन-दोनच्या रांगेने खांद्यावर पंचशील ध्वज घेवून चालल्याने मोठे आकर्षण ठरले. तर सम्यक धम्मरथाचे सारथ्य साधना मुन्तोडे यांनी केले तर मिरवणूक मार्गावर रिया बर्डे यांनी पुष्पवृष्टी केली.
एकनाथ मुन्तोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली .

यावेळी धम्मध्वजस्तंभ परिसर आकर्षक सडा रांगोळीने सजवण्यात आला होता. सम्यक धम्मरथयात्रेची सांगता सम्यक बुद्धविहार परिसरात जाहीर सभेत झाली.यावेळी प्रा.बी.एस.मुन्तोडे यांचे बुद्ध तत्वज्ञानावर व्याख्यान झाले.बुद्धाचामार्ग हा लोककल्याणाचा असून केवळ अनुकरण करण्यापेक्षा बुद्ध तत्वज्ञान समजून घेवून त्यानुसार समाजाने मार्गक्रमण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा.अनिल मुन्तोडे होते.

यावेळी प्रा अनिल मुन्तोडे म्हणाले की , बौद्ध कालखंडातील वज्जींचा वारसा आपल्याला लाभला आहे. जो पर्यंत वज्जींची प्राचीन परंपरा कायम होती तो पर्यंत अजातशत्रू वज्जीचे काहीही नुकसान करू शकला नाही.आपल्याला यापुढे वज्जीचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.ती जबाबदारी महिलांनी पूर्ण करण्यासाठी पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.

यावेळी आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पवार,प्रा.राजकुमार सावंत,संजय खरात,व बौद्धाचार्य राजेंद्र मुन्तोडे सपत्नीक हजर होते.

यावेळी बी.एस.मुन्तोडे व दिलीप बर्डे व बाळासाहेब दरेकर , अभिषेख खरात,अमोल खरात,संजय खरात,कल्याणी कदम , बबन मुन्तोडे , दत्तराज मुन्तोडे ,रावसाहेब मुन्तोडे ,आखिल मुन्तोडे ,कैलास मुन्तोडे,नामदेव मुन्तोडे ,गौरव मुन्तोडे , संगिता मुंन्तोडे , राजेंद्र मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे ,प्रतिक मुन्तोडे ,एकनाथ मुन्तोडे,प्राचार्य जगदीश मुन्तोडे, सुशील मुन्तोडे,दिनेश मुन्तोडे,गणेश मुन्तोडे,सुरज मुन्तोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन मुन्तोडे यांनी केले तर आभार बौद्धाचार्य राजेंद्र मुन्तोडे यांनी मांडले .
