संगमनेर : झुंजार न्यूज 
बहुजन समाज्याच्या न्याय हक्काकरिता एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाची निर्मिती होवून आज ५ वर्ष झाली असून संपूर्ण राज्यात या पक्षाची मुळे रोवली असून समाज्यातील प्रत्येक घटकाकरिता पक्ष लढ आहे . भविष्यात पक्षाच्या माध्यमातून तरुणांना नोकरी , व्यवसायासह राजकारणातील सत्तेचा वाटा मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव यांनी केले .
एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाची नवनिर्वाचित  पदाधिकाऱ्यांची निवडी प्रसंगी राहुरी येथे रेवननाथ जाधव  बोलत होते .  
यावेळी एकलव्य आदिवाशी बहुजन पक्षाच्या बळकटी करिता राज्य कार्यकारणी , नाशिक , बीड , अहमदनगर या जिल्हासह कोपरगांव , राहाता तालुका कार्यकारणीसह विविध पदाधिकाऱ्यांची निवड प्रदेशाध्यक्ष भाऊराव माळी , राज्य उपाध्यक्ष गवाराज माळी , राज्य कार्याध्यक्ष संजय गांगुर्डे , जिल्हा कार्याध्यक्ष कैलास पवार , राहाता संपर्क प्रमुख शंकर पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली .
यावेळी रेवननाथ जाधव म्हणाले की , पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक व निष्ठावान राहून पक्षाचे व सामाजिक कामे करुन समाज्याच्या तळागाळातील गोर गरिबांना न्याय हक्क मिळवून द्या !  तर गावो गावी आदिवासी जोडो मोहीम सुरु करुन समाज्याला  प्रबोधन करावे तसेचं भविष्यात समाज्याच्या तरुणांकरिता अष्टपैलू पैलवान 2023-24 च्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याने त्याकरिता तरुणांच्या बैठकी घेण्यात येणार आहे . समाजात अनेक अडचणी असून त्यासाठी फक्त पदभार घेऊन फिरू नका तर प्रत्यक्षात भेटुन कामे मार्गी लावा , मगच समाज तुम्हाला सत्तेवर पाठवील अशा प्रकारे पदाधिकारी यांना सुचना देण्यात आल्या. गाव तिथे शाखा करा त्याकर ती गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊन पक्ष बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कंबर कसून कामाला लागावे येणाऱ्या काळात एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाचे सरपंच, सभापती,सदस्य यासारखे पदावर कार्यकर्ते असणार  पक्षाचे धोरण नवी आशा आणि नवी दिशा हे आहेत .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *