खांजापूर मधील आदिवासी कुटुंबास यशोधनकडून किराणा साहित्य

संगमनेर : झुंजार न्यूज

खांजापुर येथील आदिवासी भिल्ल परिवारातील करता पुरुष संदीप मोरे यांच्या अकस्मात निधनानंतर या कुटुंबाच्या मदतीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या वतीने धान्य किराणा साहित्य व नवीन शिधापत्रिका चे वाटप करून या कुटुंबाला धीर देण्यात आला असून आमदार बाळासाहेब थोरात ही गोरगरीब सर्वसामान्य आदिवासी व शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले आहे.

खाजापूर येथील आदिवासी भिल्ह परिवारातील संदीप मोरे यांचे अकस्मात दुःखद निधन झाले यामुळे हा गरीब परिवार उघड्यावर पडला होता. या परिवाराच्या मदतीकरता काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यशोधन कार्यालयाच्या वतीने धान्य किराणा साहित्य व नवीन शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, मुख्य  अधिकारी श्रीराम कु-हे , पी. वाय. दिघे, खाजापूरचे सरपंच तुषार सातपुते, तात्याराम कुटे, जनसेवक अमोल सातपुते, ज्ञानेश्वर सातपुते ,जयदीप मोरे, रमेश मोरे ,अरुणा मोरे आदी उपस्थित होते .

यावेळी बोलताना बाबा खरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे गोर गरिबांचे नेते आहेत .तालुक्यातील सर्वसामान्य, आदिवासी, मागासवर्गीय, गोरगरीब, शेतकरी या सर्वांच्या पाठीशी ते कायम उभे राहिले आहेत .मोरे कुटुंबीयांची अडचण समजल्यानंतर त्यांनी तातडीने मदत पाठविली. या परिवारातील मुले ही प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिकत असून त्यांना आमदार थोरात यांच्या माध्यमातून आदिवासी आश्रम शाळेत प्रवेश देण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले

या मदतीबद्दल मोरे कुटुंबीयांनी आमदार बाळासाहेब थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात व यशोधन कार्यालयाचे आभार व्यक्त केले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed