दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी व जमीन परत मिळावी म्हणून बालोडे कुटुंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा
संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील खांडगाव या ठिकाणी बोगस भूमीहीन लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपयांची जमीन भूमीहीन दाखवून वाटप केल्याचा घोटाळा उघड झाला आहे यासंदर्भात अरुण दादा बालोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून यातील दोषी महसूल अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व सदर भूमीहीन वाटप झालेले क्षेत्र महाराष्ट्र शासन जमा करून मूळ मालकास परत द्यावे या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.

यासंदर्भात देण्यात आलेले निवेदनानुसार मौजे . खांडगाव, तालुका संगमनेर . जिल्हा अहमदनगर येथील सर्व्हे नं . 83 /1 मधील क्षेत्र 1 हेक्टर ० .5 आर व सर्व्हे नं .83 /2 मधील क्षेत्र 03 हेक्टर 0.12 आर .तत्कालीन मा. तहसिलदार साहेब संगमनेर श्री अमोल निकम यांनी नियमबाह्य अधिकार नसतांना देखील वाटप केले आहे ज्या व्यक्तींच्या नावावर सदर क्षेत्र वाटप केले आहे त्या दोन्ही व्यक्तींच्या वडिलांचे नावे जमीन क्षेत्र असल्याचे दिसून येते संबंधित व्यक्तींचे वडील हयात असून त्यांच्या जमिनीची वाटप अद्याप झालेली नाही सदर क्षेत्र वारस हक्काने या वाटप झालेल्या व्यक्तींनाच अविभक्त हिश्याने मिळणार आहे यावरून मा तहसिलदार संगमनेर यांनी बोगस कागदपत्राची कुठलीही तपासणी न करता सदर वाटपाचा आदेश केल्याचे दिसून येते यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाला आहे अशी आम्हाला खात्री वाटते या मध्ये मौजे खांडगाव येथील कामगार तलाठी व संगमनेर तहसील कार्यालयातील अव्वल कुळ कायदा कारकून तितकेच जबाबदार असून त्यांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. यासंदर्भात सर्व पुरावे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले असून लाभार्थी यांनी बोगस कागदपत्रे दाखवून काही खरेदी विक्री एजंट यांना हाताशी धरून हा सगळा प्रकार केला असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचे अटी व शर्तीचे भंग करून मा . जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांची कुठलीही पूर्व परवानगी घेतलेली नसल्याची आढळून येत आहे .या प्रकरणांमध्ये संपूर्ण कामगार तलाठी यांनी बोगस भूमिहीन असल्याचा दाखला तयार करून दिलेला असून तसेच पंचनामा दाखलातील पंचनाम्यातील माणसांना पंचनामा झाल्याची माहिती नाही सदर क्षेत्र वाटप करण्यासाठी कामगार तलाठी यांनी दिलेला दवंडी रजिस्टर वर देखील कुठल्याच प्रकारच्या नोंदी आढळून येत नाही .तसेच तहसील कार्यालयात सादर झालेल्या पत्र व्यवहारांचा आवक-जावक रजिस्टर मध्ये मध्ये देखील उल्लेख आढळून येत नाही. तसेच अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्ज , सादर केलेले कागदपत्रे , प्रतिज्ञापत्र व मागणी अर्जाची तारीख मेळ खात नाही यावरून हे सिद्ध होते की ही सर्व कागदपत्रे घरी बसून बनवले असून अधिकाऱ्यांच्या फक्त सह्या करून आर्थिक संगणमत करून हा प्रकार केला आहे. खांडगाव गावांमधून भूमीहीन वाटप क्षेत्र मिळावे म्हणून एकूण 5 अर्ज आले होते त्यातून 2 मंजूर झाले व इतर फेटाळले गेले परंतु जे क्षेत्र तहसीलदार यांनी मंजूर केले त्यातील एक आमच्याच भावकितील असून दुसरा त्याचाच नातेवाईक आहे व ज्या एजंन्टनी बोगस कागदपत्रे केले तो पण भावकितील आहे त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्यानंतर या क्षेत्राचे एजंन्टनी अर्जदार भावाकडून मुखत्यारपत्र करून घेतलेले आहे .

शासनाच्या नियमांप्रमाणे भूमिहिन वाटप क्षेत्र विकता व हस्तांतरीत करता येत नाही असा शासन आदेश आहे. मात्र या प्रकरणात सर्व नियम धाब्यावर बसून मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे. आम्ही सदर प्रकारचे अपील मा उपविभागिय अधिकारी संगमनेर डॉ . मंगरुळे साहेब यांच्याकडे योग्य ती सर्व कागदपत्रे दाखल करून मिळणे न्याय मिळणे कामी वेळोवेळी मागणी केली आहे परंतु मा . तहसीलदार संगमनेर व मा उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांनी संगनमत करून व आर्थिक गैरव्यवहार करून खोटे कागदपत्रे देऊन जमीन लाटणाऱ्या लाभार्थी यास आर्थिक संगनमत करून पाठीशी घालून जमिनीचे मूळ मालक कब्जेदार यांच्यावर अन्याय करून अशा अनेक प्रकरणांमध्ये मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार केला असल्याचा संशय आहे त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील जमीन व्यवहार व परवानगी आदेशांच्या कामाची स्वतंत्र यंत्रने मार्फत चौकशी करावी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नियम 1971 तरतूदीचे पूर्णपणे उल्लघन केले असून यामधील दोषी अधिकारी व लाभार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करावे . सदर बोगस कागदपत्रे दाखवून वाटप झालेले क्षेत्र त्वरित शासन जमा करून घ्यावे व ते मूळ मालकास परत द्यावे या संदर्भातील सर्व कागदपत्रे पुरावे शासनास दिले आहे अशी मागणी करत आहोत .

सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून दोषीवंर कारवाई करून मूळ मालकास जमीन पर मिळण्याचे आदेश त्वरित द्यावे अन्यथा दिनांक 05/06/2023 पासून कुठलीही पूर्व सूचना न देता आम्ही सर्व कुटुंबीयासमवेत मा .जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत व त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व संबंधित अधिकारी आपल्या काळ्या कृत्यावर पांघरून घालण्यासाठी काही राजकीय, अराजकीय व्यक्तीं यांच्या मदतीने खोटे आरोप धमक्या व दबाव आणण्याचा प्रयत्न करत असून आमच्या कुटुंबियांच्या जिवितास हानी पोहोचविली जाऊ शकते त्यामुळे यातील दोष अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून सदर क्षेत्र शासन जमा करून घ्यावे व मूळ मालक आम्ही असल्याचे सर्व पुरावे आपणास सादर केले असून आमची मूळ जमीन आम्हाला परत मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहोत या उपोषणामध्ये अरुण दादा बालोडे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय सामील होणार असल्याचे सांगितले आहे .
