संगमनेर : झुंजार न्यूज
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांसाठी 103 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.
या निधीबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून देवकौठे ते बोटा हा साधारण शंभर किलोमीटरचा विस्तीर्ण तालुका आहे. 171 गावे व 250 च्या पुढे वाडी वस्ती असलेला हा तालुका आहे .
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे ,रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना यांसह अनेक विकासाच्या योजना आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राबविल्या आहेत . सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो..
सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे येळुशी ठाकरवाडी वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणेसाठी 5 लाख, मोरदरा ठाकरवाडी आदिवासीवस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम करणेसाठी 5 लाख असा एकूण 10 लाखांचा निधी, पिंपळगाव देपा गावासाठी पिंपळगांव देपा येथे मोंधळवाडी येथील घाणे वस्ती मध्ये रस्ता क्रॉक्रेटीकरण करणेसाठी 10 लाखांचा निधी मिळाला आहे, शिरसगांव धुपे येथे शिरसगांव ते बांगरवस्ती रस्ता मजबुतीकरण व गटार व मोरी टाकणेसाठी 10 लाख व शिरसगांव धुपे सभामंडप बांधकाम करणेसाठी 10 लाखांचा निधी मिळाला आहे. साकुरसाठी आनंदवाडी अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण करणेसाठी 5 लाखांचा निधी, हळदावस्ती अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण करणेसाठी 5 लाख,माळवाडी वस्ती रस्ता क्रॉक्रेटीकरण करणेसाठी 5 लाख आणि जोगेपठार अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण करणेसाठी 5 लाख असा एकूण 20 लाखांचा निधी मिळाला आहे.रहिमपूर गावासाठी आदिवासी फॉरेस्ट वस्ती रस्ता क्रॉक्रेटीकरण करणेसाठी 13 लाखांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आश्वी खुर्द गावासाठी आदिवासी समाज दफनभूमी संरक्षण भिंत बांधणेसाठी 10 लाखांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे.
या निधीसाठी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी पाठपुरावा केला असून हा निधी मिळाल्याबद्दल वरील सर्व गावातील नागरिक व महिला यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्य यांचे अभिनंदन केले आहे ..
