आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ” येथील अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC)च्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिली विद्यालयाचा निकाल- 97.93% लागला असून विशेष प्राविण्य मिळवणारे एकूण विद्यार्थी – 37 तसेच प्रथम श्रेणी मध्ये एकूण विद्यार्थी – 45 ,व्दितीय श्रेणी -10,उत्तीर्ण विद्यार्थी – 95 आहे

विद्यालयातील प्रथम क्रमांक भुसाळ स्नेहा योगेश -97.00 % तर द्वितीय क्रमांक होडगर धनश्री सुरेश – 94.80% . तृतीय क्रमांक गोसावी सायली अनिल- 94.60%

यशस्वी विदयार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य बर्डे जे. आर. व पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम यांनी आभार मानले
तसेच स्थानिक स्कूल कमिटी सर्व सदस्य . शालेय व्यवस्थापन समिती व शालेय व्यवस्थापन व विकास समिती सर्व सदस्य,शिक्षक व पालक संघ व माता व पालक संघातील सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी सर्व यशस्वी विदयार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले .

या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील 10 वी च्या वर्गशिक्षिका सहाणे मॅडम व गाडे मॅडम ,थेटे, शहाणे ,संसारे,केदार,रुपवते,कोकाटे,तांबे,उंबरकर,शिंदे तसेच इतर सर्व माध्यमिक शिक्षक शिक्षिका व ज्युनिअर कॉलेज चे सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले
